महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Bandh : महापुरुषांच्या अपमानावरून महाविकास आघाडी देणार महाराष्ट्र बंदची हाक - खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्या ( Controversial statement of Bhagat Singh Koshyari ) प्रकणी खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली ( MP Sanjay Raut met Sharad Pawar ) आहे.

Sanjay Raut Met Sharad Pawar
महाविकास आघाडी देणार महाराष्ट्र बंदची हाक

By

Published : Nov 25, 2022, 8:34 PM IST

मुंबई -राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी ( Governor Bhagat Singh Koshari ) यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या बाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य ( Controversial statement of Bhagat Singh Koshyari ) केले होते. या आधीही राज्यपालांनी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अशाच प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

संजय राऊत यांनी पवारांची घेतली भेट - यासोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यभरातून केला जातो. सातत्याने महापुरुषांच्या प्रतिमेला तडा देणारी वक्तव्य केली जात असल्याने राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात यावी या चर्चेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली.

महाराष्ट्र बंदची हाक -महापुरुषांसोबत सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात यावी. यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला थेट पोहोचेल असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकजूट दाखवायला हवे असं उद्धव ठाकरे यांचं मत असून याबाबत काँग्रेस सोबत देखील चर्चा झाली आहे.

अपमान करणाऱ्यांना भाजपचा वाचवण्याचा प्रयत्न - या सर्व मुद्द्यावर शरद पवार यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. अपमान करणाऱ्यांना भाजपचा वाचवण्याचा प्रयत्नसातत्याने महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून केला जातोय. राज्यपाल ही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मात्र या सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहेत. या बाबीचा आम्ही निषेध करतो असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला आले असता सुप्रिया सुळे यांचीही भेट खासदार संजय राऊत यांनी घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलं. संजय राऊत यांची सुरक्षा कमी करणे चुकीचे आहे. संजय राऊत हे केवळ सामनाचे संपादकच नाही. तर, एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. यासोबतच ते खासदार देखील आहेत मात्र, त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे याचे आम्हाला दुःख आहे. असे सुळे म्हणाल्या.

राज्यात गलिच्छ राजकारण - खालच्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रात कधीही केलं गेलं नव्हतं. राज्याचे गृहमंत्री बदला घेतला असल्याचं वक्तव्य करत असतील तर ,महाराष्ट्राचा राजकारण कुठे चालला आहे असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details