महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणेश नाईकांविरोधात महाविकास आघाडी एकत्र - navi mumbai

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थातच यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचे कबूल केले आहे. आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मागील अनेक वर्षांपासून आपला दबदबा राखलेल्या गणेश नाईक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गणेश नाईक
गणेश नाईक

By

Published : Feb 4, 2020, 9:45 AM IST

मुंबई- राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांची नवी मुंबईतील सत्ता संपविण्यासाठी महाविकास आघाडीने मोट बांधली आहे, असे चित्र आहे. यासाठी सोमवारी (दि. 3 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचे समजत आहे. नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यासाठी त्यांनी आपण सत्तेत नसल्याने नवी मुंबईचा विकास खुंटला असल्याचे कारण पुढे केले होते.

या बैठकीत नवी मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थातच यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचे कबूल केले आहे. आता नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मागील अनेक वर्षांपासून आपला दबदबा राखलेल्या गणेश नाईक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोमवारी झालेल्या बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा करून एकमत केले असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - 'घराची नोंदणी करताना पतीबरोबर पत्नीचे नाव लावणाऱ्यांना करामधून सूट द्या'

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात महाविकास आघाडीचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासोबत शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आदी महत्वाचे मंत्री यामध्ये होणार सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - भारतीय आयुर्विमा महामंडळाचे खासगीकरण करू देणार नाही, कर्मचाऱ्यांचा निर्धार

सोमवारी झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यास संदर्भातही चर्चा झाली. गावठाणमधील बांधकामे नियमित करावी, याबाबत सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मंत्रीमंडळासमोर मांडायचा आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या, असा आग्रह करण्यात आला. तर दुसरीकडे निवडणूक आणि मतांच्या राजकारणाचा विषय नाही. तर नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवून सरकारकडून न्याय देण्यासाठी हे करत असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासंदर्भात नियमावली तयार करणे, त्यासाठी नवी मुंबईतील 95 गावातील घरांचा सर्व्हे करून त्यानंतर ही घरे नियमित करण्यासंदर्भात शासन राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - हिंगणघाटची घटना ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी - सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details