मुंबई- ज्या ठिकाणी आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला नाही, अशा ठिकाणी असलेले औद्योगिक कारखाने सुरू करण्याची राज्य सरकार परवानगी देऊ शकते, असे संकेत मंत्री सुभाष देसाई यांनी यांनी गुरुवारी दिले.
राज्यात कोरोना नसलेल्या भागातील कारखाने २० एप्रिलनंतर सुरू होण्याची शक्यता - सुभाष देसाई
राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले नाही, त्या भागातील औद्योगिक कारखाने २० एप्रिलनंतर सुरू केले जाऊ शकतात, असे राज्याचे औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी नमुद केले.

राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले नाही, त्या भागातील औद्योगिक कारखाने २० एप्रिलनंतर सुरू केले जाऊ शकतात, असेही राज्याचे औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी नमुद केले. केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच या उद्योगांना आम्ही परवानगी देऊ, असेही देसाई यांनी सांगितले.
आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी बैठकीनंतर देसाई यांनी ही घोषणा केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली आहे.