महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही' - महाराष्ट्र लॉकडाऊन निर्णय

राज्याची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील कोरोना आणि त्यावर आधारित विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने आठ राज्यांचा आढावा घेण्यात आला.

maha health minister rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Nov 24, 2020, 6:54 PM IST

मुंबई - दिल्ली, राजस्थान आदी अन्य राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, आपल्याकडे अजून तरी तशी स्थिती नाही. यामुळे तूर्तास लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात टोपे यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधानांना दिला राज्यातील परिस्थितीचा आढावा..

ते म्हणाले, की राज्याची स्थिती सध्या नियंत्रणात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील कोरोना आणि त्यावर आधारित विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने आठ राज्यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी आपण महाराष्ट्राची परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत त्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना याची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

आज राज्यात कारोनाचा इतर राज्याच्या तुलनेत आपण ग्रोथ रेटच्या दृष्टीने सेफ झोनमध्ये आहोत. कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्या आहेत. त्या कमी होता नये, असे मोदी आणि त्यांच्या टीमने सांगितले. दिवाळीत चाचण्या कमी झाल्या होत्या. आता त्या पुन्हा चाचण्या वाढवल्या जातील. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जबाबदारी देणार आहोत. तसेच त्यांना त्यासाठी टार्गेट देणार आहोत, असेही टोपे यांनी सांगितले. राज्यात चाचण्या वाढावा, असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आग्रह आहे. त्यानुसार त्या वाढवल्या जातील, असेही टोपे म्हणाले.

हेही वाचा -विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग - शरद पवार

कोरोनाची लस कधी येणार याबाबत अद्याप कालावधी निश्चित नाही. ती कधी येईल हेही माहित नाही. त्यामुळे नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच भविष्यातील परिस्थिती पाहून नियमावली तयार केली जाईल, असा मोदींचा मानस आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणची गर्दी आटोक्यात येण्यासाठी योग्यत ती नियमावली तयार करण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details