महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MAHA CORONA : धारावीमध्ये आज आढळले 94 कोरोनाबाधित, एकूण रुग्णांची संख्या 590 - MAHA CORONA LIVE

MAHA CORONA LIVE
कोरोना अपडेट

By

Published : May 3, 2020, 10:00 AM IST

Updated : May 3, 2020, 8:53 PM IST

20:50 May 03

धारावीमध्ये आज आढळले 94 कोरोनाबाधित, एकूण रुग्णांची संख्या 590

20:27 May 03

मुंबईमध्ये नवीन 441 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 613

20:02 May 03

कल्याण-डोंबिवलीत आणखी 15 जण कोरोनाबाधित, रुग्णांचा आकडा पोहचला 196 वर

20:02 May 03

जळगाव जिल्ह्यात 7 कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या 52 तर मृतांची संख्या 13 वर

जळगाव- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. रविवारी जिल्ह्यात पुन्हा 7 कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 52 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 13 आहे.

19:27 May 03

सोलापुरात आज 14 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या 128

16:06 May 03

तळीरामांना दिलासा : महाराष्ट्रात 'रेड झोन'मध्येही दारु विक्रीला परवानगी

15:58 May 03

पालघर हत्याकांडातील आरोपीला कोरोनाची लागण; वाडा शहरात 7 मे पर्यंत कडकडीत बंद

पालघर- जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यामधील कथित तिहेरी हत्याकांडातील 55 वर्षीय आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी वाडा तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र, आता पोलिस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने वाडामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. या कोरोनाबाधित आरोपीला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

12:58 May 03

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेची प्रसूती, गोंडस मुलीला दिला जन्म

11:59 May 03

कोरोना योद्धांना भारतीय सैन्याची मानवंदना; कस्तुरबा, जे जे रुग्णालयांवर पुष्पवृष्टी

मुंबई - आज सीमेवरील योद्धे कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आहेत. सैन्याच्या तीन दलातील सैनिक हजारो डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आणि कोरोनावर मात करण्यासाठी आघाडीच्या योद्धांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानन्यासाठी पुष्पवृष्टी करत आहेत. 

11:48 May 03

अकोल्यात 12 नवे कोरोनाग्रस्त, दोघींचे अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह

अकोला- कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 12 रुग्ण पॉझेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकोल्यातील एकूण रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे.

11:21 May 03

नाशिकमध्ये 27 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण आकडा 360 वर

10:57 May 03

औरंगाबादेत 24 तासात कोरोनाचे 17 नवीन रुग्ण; एकूण रुग्ण संख्या 173 वर

औरंगाबाद- राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 12 हजारांच्या पार गेली आहे. औरंगाबादमध्ये देखील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार औरंगाबादमध्ये कोरोनाचे 17 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराची रुग्णसंख्या आता 273 वर जाऊन पोहचली आहे.

10:42 May 03

सोलापूरातील 19 जणांनी केली कोरोनावर मात

सोलापूर- जिलह्यातील 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 19 जणांची तिसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली असून सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापूरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असतांना कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

10:42 May 03

हिंगोलीत आणखी 6 जण कोरोनाबाधित, एकूण आकडा 52 वर

हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एकाच दिवशी 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या दुसऱ्या दिवशी परत सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 5 जवानांचा तर एक सेनगाव येथील गृह विलगीकरण केलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. एकूण रुगसंख्या 52 वर पोहोचली आहे. वाढत्या संख्येने हिंगोलीकरांची मात्र धाकधूक वाढत आहे.

10:42 May 03

मालेगाववर कोरोना बॉम्ब, एकट्या मालेगावात 298 रुग्ण

नाशिक- मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता या विषाणूचा तालुक्यातील ग्रामीण भागात देखील शिरकाव झाला आहे. शनिवारी सांयकाळी प्राप्त अहवालानुसार १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून शहरातील रुग्णांची संख्या २९८ इतकी झाली आहे.  

10:01 May 03

चंद्रपुरात करोनाचा पहिला रुग्ण; ग्रीन झोनचे स्वप्न अधुरे

चंद्रपूर- आत्तापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसलेल्या जिल्ह्यात अखेर शनिवारी कोरोनाने शिरकाव केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

10:01 May 03

सातारा जिल्हा रेड झोनमध्ये, राज्यातील 14 जिल्ह्यांचा समावेश

सातारा- पुण्यात कोरोनाबाधितांचे दशक पूर्ण झाले होते. तेव्हा साताऱ्यात सर्वकाही आलबेल सुरू होते. कोरोनाचा व जिल्हय़ाचा काही संबंधच नव्हता. पण, 23 मार्चला पहिला रूग्ण आढळल्यापासून गेल्या 37 दिवसांत जिल्ह्याने रेड झोनची रेषा ओलांडली. केंद्राने देशात 130 तर महाराष्ट्रात 14 जिल्हे रेड झोनमध्ये सहभागी केले आहेत. त्यात साताऱ्याचाही समावेश झाला आहे.

09:43 May 03

राज्यात आज नवीन 790 रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर

मुंबई- एका बाजूला कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत असताना समाधानाची बाब म्हणजे राज्यात आज 121 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 2 हजार रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनाबाधित 790 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 12 हजार 296 झाली आहे. तर एकूण 9 हजार 775 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Last Updated : May 3, 2020, 8:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details