मुंबई - आज राज्यात नवीन कोरोनाबाधित १ हजार ८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण ९ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबतील कोरोनाबाधितांची संख्या 6457, नवीन 417 रुग्णांची भर - Corona virus
22:46 May 01
आज राज्यात 1 हजार 8 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजार 506
17:36 May 01
औरंगाबादमध्ये 3 दिवस कडकडीत बंद, कोरोनाबाधितांचा आकडा 177 वर
औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता खबरदारीचे उपाय म्हणून 3 दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज (शुक्रवार) पासून पुढील 3 दिवस पूर्ण व्यापार शंभर टक्के बंद ठेवण्यात आला आहे.
10:20 May 01
मुंबतील कोरोनाबाधितांची संख्या 6457, नवीन 417 रुग्णांची भर
09:36 May 01
राज्यात ५८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या १० हजार ४९८
मुंबई- राज्यात गुरुवारी कोरोनाबाधित 583 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 10 हजार 498 झाली आहे. तर गुरुवारी 180 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1773 रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण 8266 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.
09:25 May 01
औरंगाबादमध्ये कोरोनाचा आठवा बळी, 47 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
औरंगाबाद- शहरातील गारखेडा परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 178 वर गेली आहे.