मुंबई -अभिनेतासुशांतसिंह राजपूत हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आलेली आहे. या प्रकरणात भाजपातील काही नेत्यांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे सीबीआयची चौकशी पुढे येत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच भीमा कोरेगावचा घटनेमध्ये मुंबई पोलिसांकडून चौकशी असताना तत्कालीन सरकारने याची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिली. या चौकशीचे नेमके काय झाले? चौकशी कुठपर्यंत आलेली आहे? असे प्रश्न विचारत भाजपाने याचे उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होते. ही बैठक पार पडल्यानंतर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजपने उत्तर द्यावे -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. अशातच नाना पटोले यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपातील काही लोकांचा समावेश असल्यामुळे सीबीआयची चौकशी पुढे येत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर विरोधी पक्षाकडून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे काम करण्यात आले होते. मुंबई पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे देण्यात आलेला होता. मात्र, आता आम्हाला माहिती मिळते आहे की, सुशांतसिंह प्रकरणात भाजप पक्षाचे काही लोकांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे भाजपने यावर उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, पोलीस पथक चौकशीसाठी बीडला रवाना
भीमा कोरेगावची चौकशी कुठपर्यत आली -
भीमा कोरेगावचा घटनेमध्ये मुंबई पोलिसांकडून चौकशी असताना तत्कालीन फडणवीस सरकारने याची चौकशी एनआयएकडे का दिली? पुढे या चौकशीचे काय झाले? असा प्रश्न पटोले यांनी भाजपला केला. तसेच भाजपला कोणत्याही घटनेची चौकशी होण्याअगोदरच आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला? राठोड प्रकरणात सध्या वस्तुस्थिती समोर यायची आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्या तपासानंतरच आम्ही ही प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी सांगितले.