महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Banganga Maha Aarti: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणगंगेवर महाआरतीचे आयोजन - वाळकेश्वर बाणगंगा

वाळकेश्वर बाणगंगा (Banganga Tank) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या (कार्तिक पौर्णिमा) मुहूर्तावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. (Maha Aarti on Banganga). या कार्यक्रमाला कर्नाटक आणि उज्जैन पिठाचे महास्वामी उपस्थित राहणार आहेत.

Banganga Maha Aarti
Banganga Maha Aarti

By

Published : Nov 2, 2022, 4:07 PM IST

Updated : Nov 2, 2022, 4:28 PM IST

मुंबई: वाळकेश्वर बाणगंगा (Banganga Tank) येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या (कार्तिक पौर्णिमा) मुहूर्तावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. (Maha Aarti on Banganga). महाआरतीसाठी हजारो दिव्यांची आरास करण्यात येते व विशेष म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर महाआरती व गंगा पूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक आणि उज्जैन पिठाचे महास्वामी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुंबई शहराचे पालक मंत्री यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याचे जी एस बी टेंम्पल ट्रस्ट द्वारे सांगण्यात आले आहे.

महाआरती आणि गंगा पूजन:जी एस बी टेंम्पल ट्रस्ट ही मुंबईतील १४० वर्ष जुनी संस्था आहे. भुलेश्वर महादेव, श्री वालुकेश्वर महादेव, श्री शांतादुर्गा व शितळादेवी, माहिम आणि बाणगंगा परीक्षेत्र ही मंदिरे व इतर अनेक मंदिरे व परिसर या ट्रस्टच्या मालकीचे आहेत. यापैकी वाळकेश्वर हे पौराणिक व अति प्राचीन मंदिर असून सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील त्रिपुरारी पौर्णिमेच्या (कार्तिक पौर्णिमा) मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजता वाळकेश्वर महादेव मंदिरासमोर बाणगंगा तीर्थक्षेत्री बाणगंगा महाआरतीचे आयोजन ट्रस्टतर्फे केले आहे. या महाआरतीसाठी हजारो दिव्यांची आरास करण्यात येते व विशेष म्हणजे वाराणसीच्या धर्तीवर महाआरती व गंगा पूजन केले जाते. या नयनरम्य व अद्भूत भक्तिपूर्ण वातावरणाचे साक्षीदार बनण्यासाठी मुंबईकरानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रविण कानविंदे, मानद सचिव शशांक गुळगुळे, ऋत्विक औरंगाबादकर यांनी केले आहे. हा सोहळा दिनेश सहारा फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केला आहे.

यांची असेल उपस्थिती: हा सोहळा उज्जैन पिठाचे जगद्गुरु सद्धर्मसिंहासनाधिश्वर, जगद्गुरू राजदेशीकेन्द्र सिद्धलिंग, शिवाचार्य भगवत्पाद महास्वामीजी, उज्जयिनि सद्धर्मपीठ कर्नाटक आणि उज्जैन पीठ मध्यप्रदेश यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दिपक केसरकर, मंत्री शंभूराज देसाई हे निमंत्रित असून अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

फोटो व रील कॉन्टेस्ट:कार्यक्रमाच्या दिवशी फोटो व रील कॉन्टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यास ट्रस्टतर्फे पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरीडोर बनविण्याचा ट्रस्टचा मानस असल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर यांनी दिली. बाणगंगा तीर्थक्षेत्र कॉरीडॉर साठी सर्व हिंदू बांधवानी एकत्र यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Last Updated : Nov 2, 2022, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details