महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MAH MBA CET 2023 चे निकाल जाहीर; येथून डाऊनलोड करा तुमचा निकाल

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलकडून MAH MBA CET चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते उमेदवार अधिकृत वेबसाइटवरुन आपला निकाल मिळवू शकतात.

MAH MBA CET 2023
MAH MBA CET 2023 चे निकाल जाहीर

By

Published : Jun 4, 2023, 7:25 AM IST

मुंबई : ज्या उमेदवारांना एमबीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. ज्या उमेदवारांनी सीईटीच्या परीक्षा दिल्या आहेत. त्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलकडून MAH MBA CET चा निकाल आणि MAH MMS CET निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षा दिल्या आहेत, ते उमेदवार अधिकृत वेबसाइटवरुन आपला निकाल मिळवू शकतात.

कधी झाली होती परीक्षा :MHT MBA CET 2023 ची परीक्षा ही 25 मार्च आणि 26 मार्च 2023 रोजी घेण्यात आली होती. CET सेलने 6 मे 2023 रोजी MAH MBA CET पुनर्परीक्षा देखील आयोजित केली होती. दरम्यान या परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. या महाराष्ट्र MBA CET परीक्षेत निगेटिव्ह मार्किग = नसतात. चुकीचे उत्तर दिल्यानंतर आपले गुण यात कमी होत नाहीत. जर तुम्ही बरोबर उत्तर दिले असेल तर त्या प्रश्नाला एक गुण मिळत असतो.

उमेदवारांनी ही काळजी घ्यावी :दरम्यान CET सेलने आता निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, ते mbacet2023.mahacet.org. या अधिकृत वेबसाइटवरुन आपला निकाल डाऊनलोड करून घेऊ शकतात. MAH MBA CET स्कोअरकार्ड 2023 डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर नमूद केलेले सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत. जर निकालापत्रात काही विसंगती आढळली तर उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. MAH MBA CET 2023 चा निकाल निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी वैध आहे. अतिरिक्त माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतात.

अशाप्रकारे डाऊनलोड करा तुमचा निकाल :

  • महाराष्ट्र एमबीए सीईटी स्कोअरकार्ड फक्त काही सोप्या स्टेप्समध्ये डाऊनलोड करता येईल. निकाल मिळवण्यासाठी खालील पद्धतीने स्टेप्स फॉलो करा.
  • mbacet2023.mahacet.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजच्या डाव्या बाजूला स्कोअर कार्डवर क्लिक करा आणि डाउनलोड करा.
  • स्क्रीनवर एक नवीन विंडो दिसेल, तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणजेच तुमचा तपशील भरा.
  • तुमचा MHT MBA CET 2023 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • MHT MBA CET स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील कामासाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

हेही वाचा -

  1. Exam Fever 2022 : सीईटी-एमएचटी परीक्षेचा वेळापत्रक जाहीर; मंत्री उदय सामंताची माहिती
  2. CET 2021 Re Exam : सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी - मंत्री उदय सामंत

ABOUT THE AUTHOR

...view details