मुंबई- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही त्यात देण्यात आले आहेत. भाजपचे हे दबाव तंत्र असल्याचे आरोप मनसेच्या नेत्यांनी केला आहे. मात्र, या चौकशीशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे. ठाकरे यांना नोटीस दिल्यानंतर भाजपवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भांडारी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या 'ईडी' चौकशीचा भाजपशी काहीही संबंध नाही - माधव भंडारी - madhav bhandari
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या चौकशीशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटले आहे. ठाकरे यांना नोटीस दिल्यानंतर भाजपवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भांडारी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ईडी ही स्वतंत्र संस्था आहे. आर्थिक गैर व्यवहारांवर अंकुश ठेवण्याचे काम या संस्थेकडे आहे. ईडीकडे असलेल्या माहितीच्या आधारावर अशा प्रकारच्या नोटीसा दिल्या जातात. त्याचा सरकारशी काहीही संबंध नसतो. जर ठाकरे यांनी कोहिनूर मिलच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही चूक केली नसेल, तर त्यांना उलट या निम्मिताने आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे, असे भंडारी यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या विरोधात रान उठवले असून, त्यांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. तसेच राज्यातही त्यांनी याच मुद्यावर विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला असून, मोर्चाची घोषणाही करण्यात आली होती.