महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मंत्री, शासकीय पदावर नसलेल्या व्यक्तीस बैठकीत घेऊन सेनेचा सत्ताकेंद्र करण्याचा प्रयत्न'

शिवसेनेचे वरूण सरदेसाई हे सचिवांचा या बैठकीत दिसत असलेला फोटो व्हायरल झाला होता. यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी प्रतिक्रिया देत, सेना सत्ताकेंद्र करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

माधव भंडारी
माधव भंडारी

By

Published : Dec 4, 2019, 7:10 PM IST

Updated : Dec 4, 2019, 7:40 PM IST

मुंबई- शिवसेनेचे वरूण सरदेसाई हे कोणत्याही शासकीय पदावर नसताना सचिवांच्या बैठकीत उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यावर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, मंत्री नसलेले किंवा शासकीय पदावर नसलेले व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे वरूण सरदेसाई हे सचिवांचा या बैठकीत दिसत आहेत. हा प्रकार घटनाबाह्य असून सत्ताकेंद्र करण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेकडून शिष्ठाचार पळाला जात नाही सरकारच्या कारभारावर शंका निर्माण होत आहे.

माधव भंडारी

अमृता फडणवीस एका शासकीय बैठकीत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात काही तथ्य नाही या बैठकीत भाजप पदाधिकारीही आहेत. त्यामुळे ती कोणतीही शासकीय बैठक नव्हती. अमृता फडणवीस या अनेक सामाजिक संस्थेच्या सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्यातरी सामाजिक संस्थांच्या बैठकीत सहभागी झाल्या असतील हा गैरसमज पसरविले जात आहेत ते चुकीचे असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

हेही वाचा - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून धारावीतील शिवसैनिक करणार भाजपत प्रवेश

Last Updated : Dec 4, 2019, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details