महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हाडा रहिवाशांना दिलासा; वसाहतींचा विकास स्वतः म्हाडा करणार - committee

म्हाडा कोणावरही पुनर्विकास लादणार नसून ज्यांना म्हाडाकडून पुनर्विकास करून घ्यायचा असेल, त्यांच्या इमारतीचे पुनर्विकास करणार आहे. म्हाडाकडे घराचा साठाही नसल्यामुळे जर या जुन्या म्हाडा वसाहतींचा विकास झाला तर घराचासाठा ही वाढेल आणि याचा वापर लॉटरी करण्यात येईल. तसेच म्हाडा वसाहतीसमोर वाढीव सेवा शुल्क प्रश्न प्रलंबित आहे.

म्हाडा रहिवाशांना दिलासा

By

Published : Jun 18, 2019, 10:37 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. या इमारती अनेक वर्षे जुने असल्यामुळे जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींना पुनर्विकासाची गरज आहे. मात्र खासगी विकासकाने पुनर्विकासाठी घेतलेले अनेक प्रकल्प रखडल्यामुळे इमारती पुनर्विकासाकरिता देण्यासाठी खोलीधारक तयार नाही. यामुळे आता म्हाडानेच पुढाकार घेत या वसाहतीचा पुनर्विकास करणार आहे, अशी माहिती आज म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

म्हाडा रहिवाशांना दिलासा

म्हाडा प्राधिकारणांच्या बैठकीत म्हाडा इमारतीचा विकास स्वतः करण्याच्या निर्णयामुळे विकासकांना कंटाळलेल्या इमारतवाशियांना याचा फायदा होणार आहे. या पुनर्विकासाठी सभापती मधु चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. म्हाडा कोणावरही पुनर्विकास लादणार नसून ज्यांना म्हाडाकडून पुनर्विकास करून घ्यायचा असेल, त्यांच्या इमारतीचे पुनर्विकास करणार आहे. म्हाडाकडे घराचा साठाही नसल्यामुळे जर या जुन्या म्हाडा वसाहतींचा विकास झाला तर घराचासाठा ही वाढेल आणि याचा वापर लॉटरी करण्यात येईल. तसेच म्हाडा वसाहतीसमोर वाढीव सेवा शुल्क प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ही समिती तयार करण्यात आली आहे व लवकरच हा प्रश्न सोडवू, असे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details