मुंबई - प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयं सेवक संघाविरोधातील वक्तव्यावरुन मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी केले होते. या विरोधात जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना 6 फेब्रुवारीला मुलुंड न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहेत.
रास्व संघाकडून अधिकृत पत्र नाही :जावेद अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत तक्रारदाराला संघटनेच्या वतीने मानहानीची तक्रार दाखल करण्याचा अधिकार पत्र देण्यात आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कोणतेही अधिकार पत्र रेकॉर्डवर ठेवलेले नाही. प्रतिवादी क्र. 2 तक्रारकर्ता स्वतःला संघाचा समर्थक स्वयंसेवक म्हणवतो. तीन अभिव्यक्ती वेगवेगळ्या अर्थांना सूचित करतात. त्यामुळे तक्रारीच्या वाचनातून त्याची भूमिका काय आहे हे स्पष्ट होत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली :या प्रकरणात न्यायालयाने जावेद अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे.