मुंबई -राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी एक रकमी एफआरपी ( FRP ) मिळावी यासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Self-respecting Farmers Association ) नेते राजू शेट्टी ( Raju Shetty ), इतर संघटनांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री ( Cooperation Minister Atul Save ) , कृषी मंत्री यांनी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
साखर कारखान्यांवर कारवाई करणार -डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रिकामी एफ आर पी द्यावी असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या संदर्भात अद्यापही जर साखर कारखान्यांनी कोणतीही कारवाई केली नसेल तर अशा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी अधिवेशनापूर्वी नक्की होईल अशी ग्वाही सावे यांनी दिली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असेही ते म्हणाले.