महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवप्रतिष्ठान संस्थेचा 'माणुसकीचा फ्रिज' रिकामाच; गोरगरीबांवर उपासमारीची वेळ - 'manuskicha Fridge' shivsena scheme latest news

कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक हेतूने शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे 'माणुसकीचा फ्रिज' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. अणुशक्ती नगर बस डेपोच्या समोर हा उपक्रम राबण्यात येत होता.

माणूसकीचा फ्रिज
माणूसकीचा फ्रिज

By

Published : Mar 19, 2021, 6:16 PM IST

Updated : Mar 19, 2021, 7:39 PM IST

मुंबई- शहरात करोनामुळे हातामध्ये काम नाही, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी,आणि मानसिक, शारीरिक आजाराने त्रासलेले असे अनेक लोक उपाशी असलेलेल मिळतात. या उपाशी लोकांना दोन घास खायला मिळावेत म्हणून काही महिन्यांपासून शिवसेना अणुशक्ती नगरतर्फे 'माणुसकीचा फ्रिज'द्वारे उपक्रम राबण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत उपाशी राहणाऱ्या लोकांना काही प्रमाणात का होईना खायला अन्न मिळत होते. मात्र, आता त्या फ्रिजची अवस्था दयनीय झाली असल्याचे काहीसे चित्र समोर आले आहे.

शिवप्रतिष्ठान संस्थेचा 'माणुसकीचा फ्रिज' रिकामाच

माणुसकी आटली आहे का?

कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक हेतूने शिवसेना आणि शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे 'माणुसकीचा फ्रिज' हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. अणुशक्ती नगर बस डेपोच्या समोर हा उपक्रम राबण्यात येत होता. पण आता सध्या त्या फ्रिजची अवस्था दयनीय झाली आहे. हा फ्रिज सध्या रिकामा पाहायला आपल्याला मिळत आहे. रिकाम्या फ्रिजकडे पाहून माणुसकी आटली आहे का? असा प्रश्न मनात उभा राहतो.

सामान्य माणसाचा हातभार नाही
शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे दुपारी आणि रात्री बारा ते पंधरा जेवणाचे डबे फ्रिज मध्ये ठेवण्यात येतात. पण त्याच्या व्यतिरिक्त सामान्य नागरिकांकडून कोणत्याच प्रकारचा मदतीचा हात पुढे येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

Last Updated : Mar 19, 2021, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details