महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Love Jihad : क्लासच्या नावाखाली अहमदनगर जिल्ह्यात लव जिहादचे रॅकेट; विधानपरिषदेत मुद्दा गाजला - विधानपरिषद पावसाळी अधिवेशन 2023

आमदार प्रसाद लाड यांनी लव जिहादचे (MLA Prasad Lad on Love Jihad) एक मोठे प्रकरण उघडकीस आणले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात लव जिहाद सुरू (Love Jihad in Ahmednagar) असल्याचा आरोप लाड यांनी विधानपरिषदेत बोलताना केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 28, 2023, 4:04 PM IST

मुंबई - भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून (MLA Prasad Lad on Love Jihad) नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. क्लासच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला (Love Jihad in Ahmednagar) आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात लव जिहादचे रॅकेट काम करत आहे. क्लासच्या नावाखाली या गावात मुलींचे धर्मांतर केले जात असून, हे प्रकरण दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला - प्रसाद लाड, आमदार, भाजपा

काय आहे प्रकरण - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अतिशय धक्कादायक घटना प्रसाद लाड यांनी उजेडात आणली आहे. याविषयी बोलताना लाड म्हणाले की, २६ जुलैला उंबरे गावात साधारणतः दहा ते पंधरा इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुली एका शिक्षिकेकडे गेल्या वर्षभरापासून घरगुती क्लाससाठी जात होत्या. मात्र, क्लासच्या नावाखाली भलतेच काहीतरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उंबरे गावात सुरू होता. लव जिहाद व धर्मांतर हे कशा पद्धतीने प्लानिंग करून केले जाते याचे हे जिवंत उदाहरण आहे, असे लाड म्हणाले.

क्लासच्या नावाखाली धर्मांतर -प्रसाद लाड पुढे म्हणाले की, उंबरे गावातील एक महिला या प्रकरणातील आरोपी आहे. ती महिला तेथील सर्व मुलींना दुसऱ्या एका मुलीकडे क्लास लावण्यास भाग पाडत होती. तसेच शिक्षिका ही क्लासमध्ये इस्लाम, कुराणसंदर्भात मुलींना शिकवायची. तसेच ईद किंवा इतर सणांना शीरखुर्मा सर्वांना खाऊ घालत असायची आणि शीरखुर्मा खाल्ल्यानंतर आम्हाला सेल्फी घ्यावा लागतो असे सांगून त्या मुलींचे सदर भेटीदरम्यान काही मुलांसोबत ओळखी करून त्यांची सेल्फी काढायचे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी -सदर सेल्फी चुकीच्या पद्धतीने मोर्ब करून त्या क्लासमधील मुलींना ब्लॅकमेल केले जात होते. तसेच धमकावून सांगितले जायचे की जर तू माझ्यासोबत पळून नाही गेली तर हे फोटो सोशल मीडियाला व्हायरल करेल आणि शीरखुर्मा खायला त्या मुलींना त्या गावातील मशिदीमध्ये नेले जायचे, अशा पद्धतीने प्रसाद लाड यांनी ही घटना सभागृहात सांगितली.

पोलिसांनी हार्ड डिस्क गायब केली - प्रसाद लाड पुढे म्हणाले की, या घटनेबाबत एका अल्पवयीन मुलीने या प्रकरणाला वाचा फोडली आणि घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. प्रथमतः सर्व घटना दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. तसेच घटनेशी संबंध नसताना काही मुलांवर चुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, तेथील काही कार्यकर्त्यांनी एका मंगल कार्यालयात पीडित मुलींना भेटण्यासाठी आणि घडलेला प्रकार ऐकण्यासाठी सदर विषयासंदर्भात बैठक घेतली. बैठक चालू असताना पोलिसांनी बळाचा उपयोग करून तेथील सर्व कार्यकर्त्यांवर अमानूष पद्धतीने मारहाण केल्याचा आरोप लाड यांनी केला आहे. तसेच प्रसाद लाड पुढे म्हणाले की, बैठकीत उपस्थित मुलांवरच गुन्हे दाखल करून आरोपी बनवले. तसेच हा संपूर्ण प्रकार मंगल कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. तसेच आरोपी बनवलेल्या मुलांचा काहीच संबंध या घटनेशी नाही असे पोलिसांना देखील समजले होते. त्यामुळे पोलिसांनी मंगल कार्यालयातील हार्ड डिस्क गायब करून टाकली, असा आरोपही प्रसाद लाड यांनी केला आहे.

उच्चस्तरीय चौकशी - याबाबत निवेदन देताना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात महानिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करून तात्काळ या आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा -

  1. Gopichand Padalkar On Love Jihad: पुण्यातील दोन प्रकरणांमध्ये लव्ह जिहाद...गोपीचंद पडळकर यांचा दावा
  2. Pankaja Munde On Love Jihad : पंकजा मुंडे म्हणाल्या, 'लव्ह जिहाद चुकीचे, पण..'
  3. Solapur Crime News: सोलापूरमध्ये लव जिहादचा संशयावरून महाविद्यालयीन तरुणाला मारहाण; एका संशयितास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details