मुंबई- मुंबईत घर घेणे हे सर्वसामान्यांसाठी जणू दिवास्प्नच आहे. कारण, घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांना घर घेणे जवळपास अशक्य होते. अशातच म्हाडाकडून बांधण्यात येणाऱ्या घरांमुळे मोठा दिलासा मिळतो. गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ म्हणजेच म्हाडाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधण्यात येतात. बाजारभावापेक्षा कमी किमतीत असल्याने सर्वसामान्य या घरांसाठी जीवाचा आटापिटा करतात.
कोरोनानंतर मुंबईतील रियल इस्टेट मार्केट काहीसे थंडावले असले तरी घरांच्या किमतीवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट हजारो सर्वसामान्य नागरिक परवडणाऱ्या घरांसाठी अजूनही धडपडत आहेत. अशा व्यक्तींना दिलासा म्हणजे म्हाडाची 18 जुलैला प्रसिद्ध होणारी ४०८६ घरांची लॉटरी असणार आहे.
- ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
म्हाडाच्या सोडतीसाठी 22 मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. 26 जून 2023 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम जमा करून या सोडत प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
- कुठे आहेत घरे?
म्हाडाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या या सोडतीत नागरिकांसाठी मुंबईतील पश्चिम उपनगरात पूर्व उपनगरात आणि मध्य मुंबईतही घरे असणार आहेत. यामध्ये परळ, दादर, अँटॉप हिल, विक्रोळी जुहू अंधेरी आणि गोरेगाव या ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईतील विविध ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहे. तरी मुख्यत्वे गोरेगाव येथे 1800 घरे उपलब्ध होणार आहेत.
- काय असतील घरांच्या किमती?
- सोडत प्रक्रियेत नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला जाणाऱ्या घरांच्या किमती या 34 लाखांपासून अगदी आलिशान घराची किंमत सात कोटी रुपयांपर्यंत आहेत
- लाख रुपये किमतीचे 270 चौरस फुटाचे घर विक्रोळी येथील संकुलात उपलब्ध असणार आहे.
- त्यानंतर तीनशे साडेतीनशे आणि पाचशे अशा अत्यल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट अशा गटांमध्ये सोडत निघणार आहेत. या घरांच्या किमती त्याप्रमाणे ठरणार आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी 40 ते 45 लाख रुपयांच्या आसपास घराची किमती असून तीनशे ते साडेतीनशे चौरस फुटाचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- या लॉटरी सर्वाधिक महागडे घर हे सात कोटी रुपयांचे आहे. हे घर ताडदेव कॉम्प्लेक्समध्ये असणार आहे. हे घर पंधराशे चौरस फुटाचे आहे.
- जुहू येथील एका घराची किंमतही चार कोटी रुपये ठरवण्यात आली आहे.