मुंबई - महाराष्ट्रात स्थापन होणारे सरकार शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्त्वाखाली असेल यात शंका नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असा विश्वास त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या निमित्ताने काँग्रेसपुढे संधी आणि आव्हानही!
याबरोबरच केंद्रातील सत्तेतून पायउतार झाल्यानंतर संसदेत शिवसेना खासदारांच्या जागेत बदल करण्यात आल्याच्या वृत्ताला राऊत यांनी दुजोरा दिला. आताची एनडीए आणि पुर्वीच्या एनडीएमध्ये मोठा फरक आहे. आता एनडीएमध्ये लोकांना एकत्र करणारा कोण आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच एनडीएचे संस्थापकांपैकी असलेले लालकृष्ण अडवाणी आता सक्रिय राजकारणा पासून लांब फेकले गेलेत असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा -आता संजय राऊतांची तोफ भाजपविरोधात धडाडणार; राज्यसभेत शिवसेनेच्या आसन व्यवस्थेत बदल
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष मिळून सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली करीत आहेत. त्यासाठी समान किमान कार्यक्रमाचा मसुदा देखील तयार करण्यात आला. तो मसुदा वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, आता वरिष्ठांनी हिरवा कंदील दिल्यानंतर सरकार स्थापन करू, असे तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यपालांसोबत होणारी ही भेट सत्ता स्थापनेच्यादृष्टीने देखील महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, यामध्ये फक्त दुष्काळासंदर्भात चर्चा होणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले होते. तरीही या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.