महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

University Reform Bill : सरकारला विद्यापीठांना आपले शासकीय महामंडळ बनवायचंय - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis on University Reform Bill

विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या सर्वात काळा दिवस आहे. विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा न करता हे विधेयक पास करण्यात आले. विधेयकाच्या बाबतीत आम्ही महत्त्वाचे आक्षेप घेतले होते. त्या आक्षेप विचारात घेतले गेले नाही, आरोप त्यांनी केला. ( Devendra Fadnavis on University Reform Bill )

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 29, 2021, 12:08 AM IST

मुंबई - हिवाळी अधिवेशन मंगळवारी संपले. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ( Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar Press Over University Reform Bill )

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या सर्वात काळा दिवस आहे. विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा न करता हे विधेयक पास करण्यात आले. विधेयकाच्या बाबतीत आम्ही महत्त्वाचे आक्षेप घेतले होते. त्या आक्षेप विचारात घेतले गेले नाही. सरकारला विद्यापीठांना आपले शासकीय महामंडळ बनवायचे आहे. याआधी मंत्र्यांना कधीही विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. मात्र, आता सरकारला तो अधिकार मिळणार आहे. विद्यापीठांवर सरकारचा कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ( Devendra Fadnavis Criticized MVA Government Over University Reform Bill )

माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

उच्च तंत्रशिक्षण मंत्री हे टेंडरचे पेपर बोलावत ढवळाढवळ करत होते. आता त्यांनी सगळे अधिकार घेतले आहे. विद्यापीठांमध्ये मनमानी करण्याचा अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात हे विधेयक आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी आता सर्व अधिकार हे आपल्याकडे घेतले आहे. विद्यापीठे या विधेयकामुळे राजकारणाचा अड्डा बनणार आहे. मेजॉरिटी असताना अध्यक्षाची निवडणूक ते घेऊ शकत नाही. सरकारच्या आमदारही त्यांच्या विरोधात आहेत. आम्ही सर्व फोरमवर जानेवारी महिन्यात विद्यापीठाच्या विधेयकाबाबतची लढाई लढू. या विधेयकाच्या विरोधात राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन सुरू केले जातील. आता ज्याप्रकारे परीक्षेमध्ये घोटाळे झाले त्याच पद्धतीने पुढच्या वेळेस डिग्री विकल्या जातील, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा -No Election Assembly Speaker : अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बहुमत असूनही सरकारला भीती वाटते आहे. संविधान जे सांगेल ते मी करेल, हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी सांगितले आहे. भीती पोटी हे अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ शकले नाही. पण प्रकुलपती पद आणत मंत्र्यांनी अधिकार घेतले आहे.

माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

हे विधेयक म्हणजे राज्य सरकारचा आतंकवाद आहे. या विधेयकाबाबत सूचना मांडत असताना हा कायदा राज्य सरकारने पास केला आहे. दुसऱ्याचे मार्कशीट घेऊन हे सरकार सत्तेवर आले आणि आता तीच बेईमानी विद्यापीठाच्या विधेयकाबाबत ते करत आहेत. शिक्षण व्यवस्थेमध्ये अव्यवस्था करण्याचे पाप राज्य सरकार करत आहे. उठ तरुणा जागा हो, या सरकारच्या विरोधात संघर्षाचा धागा हो, असे आवाहन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नाव उदय आहे. मात्र, शैक्षणिक व्यवस्थेचा अस्त करण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. तसेच लोकशाहीचे वस्त्रहरण राज्य सरकारने केले आहे. मात्र, जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले. ( Sudhir Mungantiwar Criticized MVA Government Over University Reform Bill )

माध्यमांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

ABOUT THE AUTHOR

...view details