महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Look Back 2022 : मुंबई मेट्रो मार्ग तीनला मिळाली चालना तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला गती - Look Back 2022

( Look Back 2022 ) सरत्या वर्षात परिवहन विभागाच्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. ठाणे ते भिवंडी मेट्रो मार्ग ५च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई मेट्रो ( Mumbai Metro Line ) मार्गीका 3 भुयाराचे शंभर टक्के काम पूर्ण देखील झाले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला गती (Speeding up Mumbai Trans Harbor Link project), महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक आणि डिझेलच्या हजारो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी परिवहन विभागात ( Transport Department ) घडल्या. ( Mumbai Metro Line three got boost )

Transport Department
परिवहन विभागाच्या महत्त्वाच्या घडामोडी

By

Published : Dec 26, 2022, 1:55 PM IST

मुंबई : ( Look Back 2022 ) ठाणे ते भिवंडी मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो मार्ग ५ ठाणे भिवंडी कल्याण या मर्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान १२.७ किमीचा पहिला टप्पा प्रगतीपथावर असून यामध्ये स्थानकांची ६४ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली असून, एकूण ७० टक्के इतकी भौतिक प्रगती साध्य करण्यात ( Material progress was achieved ) आली आहे.


मुंबई मेट्रो मार्ग तीनला मिळाली चालना :बहुचर्चित मुंबई मेट्रो मार्ग तीन सत्तांतर झाल्यानंतर त्यास मिळाली. महाविकास आघाडी शासनाच्या काळामध्ये मुंबई मेट्रो मार्गी येथे कारशेड कंजूरमार्ग येथे करण्याबाबतचा निर्णय झाला. मात्र शिंदे फडणवीस शासनाने हा निर्णय रद्द करून आरेच्या जंगलांमध्येच कारशेड निर्णय करून भूमिपूजन करून उद्घाटन केले. नुकतेच मुंबई मेट्रो मार्गीका 3 भुयाराचे शंभर टक्के काम पूर्ण देखील झाले. ( Mumbai Metro Line three got boost )


मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला गती :मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि रेवस कारंजा पूल या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जलद वाहतूक तसेच व्यापारउदिम, दळणवळण यांना चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प वेळेत सुरु व्हावा व जमिनअधिग्रहण विषयक प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी जनतेला अद्ययावत माहिती जिल्हाधिकारी यांचेमार्फत देण्यात यावी, असे निदेश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले. ( Speeding up Mumbai Trans Harbor Link project )


एसटी आंदोलनातून कामगारांना काय मिळाले :राज्यात अभूतपूर्व एसटीच्या कामगार कर्मचाऱ्यांचा संप झाला. या संपामधून कामगारांना प्रत्यक्ष काय मिळाले. हा मोठा प्रश्न आजही उपस्थित आहे. याचे कारण महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक आणि डिझेलच्या हजारो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु या बाबत प्रत्यक्ष खरेदीसाठी तीन ते चार वर्षे लागणार आहे. असे एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच्यामुळे नवीन भरती देखील त्याच्यामुळे रखडली आहे.


बुलेट ट्रेन प्रकल्पाचे पुढचे पाऊल :मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने जपानची सुजित्झ कॉर्पोरेशन आणि एल अँड टी यांच्यासोबत केला नवा करार केला आहे. बुलेट ट्रेन साठी 1,050 मशिनरी जपानमधून खरेदी करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.साबरमती येथे बुलेट ट्रेन डेपोच्या बांधकामासाठी हा करार केला आहे.


वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे बुलेट ट्रेनचे काम कागदावरच :केंद्र शासनाकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली जात आहे. आतापर्यंत राज्यात 98 टक्के टक्के भूसंपादन करून कामे वेगाने झाली. डिसेंम्बर पर्यन्त राज्यातील बुलेट ट्रेन भौतिक प्रगती काम 13.26 टक्के काम झाले आहे.तर दोन्ही राज्यात 98 टक्के भूसंपादन काम पूर्ण झाले आहे. परंतु मुंबईमधील बुलेट ट्रेन स्थानक बाबत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही.


आशिया पॅसिफिक प्रदेशात CSMIA विमानतळ : आशिया पॅसिफिक प्रदेशात आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची कार्बन उत्सर्जन कमी करणारे विमानतळ म्हणून भर पडली आहे. आशियाई पॅसिफिक प्रदेशात आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची देखील उत्कृष्ट म्हणून गणना होणार आहे. आशिया पॅसिफिक प्रदेशात CSMIA विमानतळ आता तिसरे कार्बन उत्सर्जन कमी करणारे म्हणून ख्याती झाली आहे. तसेच डिसेंबर 2022 मध्ये एकाच दिवशी एक लाख 50 हजार पेक्षा अधिक प्रवाशांनी या विमानतळावर प्रवास करून रेकॉर्ड स्थापित केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लाखोंच्या संख्येने ये जा असते. शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबर 2022 रोजी एजन्सींना कोविड प्रोटोकॉल पालन करण्याचे निर्देश जारी केले मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्याही चाचण्या सुरू नसल्याचे 22 डिसेंम्बर 2022रोजी आढळून आले. ( CSMIA Airport in Asia Pacific region )

लोकल उशिरा धावण्याची कटकट दूर होणार :मध्य रेल्वेवर रोज 40 लाख पेक्षा अधिक प्रवासी लोकल ट्रेन ने प्रवास करतात. बाराशे पेक्षा अधिक लोकल ट्रेन मध्य रेल्वेच्या मार्गावर धावत आहेत. मात्र रोज कल्याण येथे कोणतीही लोकल आली की तिला पास होण्यासाठी अर्थात पुढे जाण्यासाठी एकच रेल्वे मार्ग क्रॉसिंग साठी उपलब्ध आहे.परिणामी लोकल उशिरा धावतात. त्यामुळे मध्य रेल्वेने महत्त्वाचे काम सुरू केले आहे. कल्याण येथे अतिरिक्त सहा फलाट केले जातील. त्यामुळे पुण्यावरून किंवा नाशिक मार्गे येणाऱ्या सर्व ट्रेन यांना क्रॉसिंगची अडचण होणार नाही. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन उशिराने धावणार नाही.


ऐतिहासिक वारसा जपत तीन रेल्वे स्थानक होणार आधुनिक :सीएसएमटी, दिल्ली, अहमदाबाद, आधुनिकीकरणसाठी १० हजार करोड मंजूर झाले. भारतातील ऐतिहासिक रेल्वे स्थानके आधुनिक होणार आहे. त्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांची घोषणा पंतप्रधानांनी केबिनेट बैठकीत मंजुरी दिली.

उबेर ॲग्रीगेटर नाही सर्विस प्रोव्हायडर :मुंबईतील उबेर कंपनीच्या टॅक्सी चालकामुळे महिलेचे चेन्नईला जाणारे विमान चुकले. या कारणास्तव प्रवासी महिलेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ग्राहक न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल देत उबेरला यासाठी 20,000 रुपयाचा दंड ठोठावला. उबेर ने उत्तम सेवा प्रवाशांना दिली नाही असे फटकारले आणि हा सज्जड दंड ठोठावला.


टॅक्सी रिक्षा भाडे वाढ सामान्यांना डोईजड :सामान्यांसाठी रिक्षा टॅक्सी महाग झाली. टॅक्सीसाठी 28 रुपये रिक्षासाठी 23 रुपये दर वाढ केली आहे. वाढती इंधन महागाई कोरोना पार्श्वभूमीवर टॅक्सी रिक्षा चालकांना जगणे मुश्किल झाले होते. त्यांनी केलेल्या मागणीवर परिवहन विभागाने निर्णय घेतला.


ABOUT THE AUTHOR

...view details