मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री संपूर्ण भारत 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आर्थिक राजधानी मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुंबळ गर्दी झाली आहे. घरगुती गॅस सिलींडरसाठी वरळी येथे लांबच्या लांब रांगा लागलेले चित्र पाहायला मिळाले. आता मात्र, त्याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
देशभर लॉकडाऊन.. मुंबईत लागल्या गॅस सिलींडरसाठी रांगा - गॅस सिलींडर रांग
मुंबईकर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. घरातील भाजीपाला व दुध घेण्यासाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता मात्र, पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबईकर जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. घरातील भाजीपाला व दुध घेण्यासाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, अत्यावश्यक या सेवा सुरू राहतील, असे बजावले असताना देखील लोकांनी गर्दी केली.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करून लोकांना पुन्हा एकदा अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार, असे सांगितले होते. पोलिसांनीही लोकांना आवाहन केले की, गॅस सिलींडर हे जीवनाअशक्य आहे ते तुम्हाला मिळणारच आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका.