महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीत मतदारांना करता येणार ऐपवर आपली तक्रार; EVM-VVPATचा होणार पाहिल्यांदा वापर

राज्यात एकूण ९५ हजार ४७३ मतदान केंद्र आहेत. यात ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ इतके मतदान केंद्र आहेत. यामध्ये ६ हजार २ मतदान केंद्राची वाढ झाली आहे. तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्र आहेत. त्यात ११ हजार ९९६ मतदान केंद्र वाढले आहेत.

लोकसभा निवडणुकीत मतदारांना करता येणार ऐपवर आपली तक्रार

By

Published : Mar 10, 2019, 10:08 PM IST


मुंबई - राज्यात लोकसभा निवडणूक ही ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यात घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामध्ये मतदारांना आपल्या तक्रारी नोंदवता येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी आज मुंबईत दिली.


राज्यात २०१४ सालच्या तुलनेत एकूण संख्येमध्ये ६५ लाख ३१ हजार ६६१ इतकी वाढ झाली आहे. प्रथम मतदार १८ ते २२ वर्षे वयामध्ये २५ लाख १३ हजार १५७ पुरुष तर १७ लाख ३२ हजार १४६ महिला आणि १४२ तृतीयपंथी असे एकूण ४२ लाख ४५ हजार ९४५ नवीन मतदार नोंदणी झालेले आहेत. यावर्षी मतदार यादीमध्ये एकूण २ लाख २४ हजार १२२ इतके अपंग मतदारांचाही समावेश आहे.
तर २०१४ च्या तुलनेत यंदा मतदान केंद्राच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


राज्यात एकूण ९५ हजार ४७३ मतदान केंद्र आहेत. यात ग्रामीण भागात ५५ हजार ८१४ इतके मतदान केंद्र आहेत. यामध्ये ६ हजार २ मतदान केंद्राची वाढ झाली आहे. तर शहरी भागात ३९ हजार ६५९ मतदान केंद्र आहेत. त्यात ११ हजार ९९६ मतदान केंद्र वाढले आहेत.


राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान EVM-VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. राज्यात एकूण २.१५ लाख BUs, एकूण १.२४लाख CUs आणि १.३५ लाख VVPATs यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यासोबत १९५० हा हेल्पलाइन क्रमांक मतदारांना सर्व प्रकारची माहिती देणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details