मुंबई -राजधानी दिल्लीमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 1 हजार तरुण आणि तरुणींना विशेष रेल्वेद्वारे राज्यात आणण्यासाठी नियोजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रेल्वे व्यवस्थापनाची तक्रार केली आहे. चांगली व्यवस्था मिळाली नसल्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर लिहिले आहे. शनिवारी रात्री खूप उशिरा ही विशेष रेल्वे दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.
दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा रेल्वे व्यवस्थापनावर आरोप - maharashtra upsc student stranded delhi
राजधानी दिल्लीमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 1 हजार तरुण आणि तरुणींना विशेष रेल्वेद्वारे राज्यात आणण्यासाठी नियोजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रेल्वे व्यवस्थापनाची तक्रार केली आहे.
काही विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ शुट करून तो समाज माध्यमावर टाकला. त्यात ते रेल्वेमध्ये स्वच्छता नसल्याचे सांगत आहेत. तसेच आम्हाला सांगण्यात आले होती की, ही विशेष रेल्वे असेल आणि चांगली व्यवस्था करण्यात येईल. मात्र, आम्हाला रेल्वेतील जनरल कोचमध्ये बसवण्यात आले. तसेच सर्वांना शनिवारी सकाळी 10 वाजता रेल्वेस्थानकार यायला सांगितले होते. मात्र, दिवसभर प्रतीक्षा करून रात्री 10 वाजता रेल्वे मुंबईच्या दिशेने निघाली. अशी माहिती स्नेहल चव्हाण या विद्यार्थिनीने दिली. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंशिवाय इतर कोणीही आम्हाला मदत केली नसल्याची विद्यार्थी सांगत होते.