मुंबई -लॉकडाऊनच्या काळात पायाभूत सुविधांच्या बांधकामाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार आजपासून मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील सहा मेट्रो मार्गाच्या बांधकामासह इतर प्रकल्पाच्या कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम एमआरडीए) कडून सुरुवात करण्यात आली आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून सर्व प्रकारचे बांधकामे बंद करण्यात आले. पायाभूत सुविधा प्रकल्पाचे कामही बंद होते. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळत प्रकल्पाची कामे सुरू करू देण्याची मागणी एमएमआरडीएकडून होत होती. अखेर राज्य सरकारकडून 20 एप्रिल पासून बांधकामाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार आजपासून सहा मेट्रो मार्गिकेसह इतर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती डॉ. बी. जी. पवार, सहमहानगर आयुक्त यांनी दिली आहे.
Lockdown : मुंबईत मेट्रोसह इतर प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात... - lockdown
लॉकडाऊन लागू झाल्यापासून सर्व प्रकारचे बांधकामे बंद करण्यात आले. पायाभूत सुविधा प्रकल्पाचे कामही बंद होते. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळत प्रकल्पाची कामे सुरू करू देण्याची मागणी एमएमआरडीएकडून होत होती. अखेर राज्य सरकारकडून 20 एप्रिल पासून बांधकामाला परवानगी देण्यात आली.
मेट्रोसह इतर प्रकल्पांच्या बांधकामाला सुरुवात
मुंबई, ठाण्यातील कंटेंटमेंट झोन वगळता इतर भागात कामे सुरू झाली आहेत. प्रकल्पाच्या कामासह पावसाळा पूर्व कामाला 11 हजार मजूरांच्या माध्यमातून काम सुरू झाले आहे. या मजुरांची सर्व जबाबदारी एमएमआरडीएने घेतली आहे. तर सर्व नियम पाळत कामे सुरू राहतील असेही पवार यांनी सांगितले आहे. शहरात जो भाग कंटेनमेंट परिसर म्हणून घोषित केला आहे. त्या ठिकाणी मात्र कोणतेही काम सुरू होणार नाही.