महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lockdown In Mumbai: रुग्णसंख्या 20 हजारावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन - महापौर

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत (Number of corona patients in Mumbai) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा बंद झाल्या आहेत. (Schools in Mumbai are closed) गर्दी टाळा असे आवाहन केले जात आहे. मात्र दुर्लक्षा मुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. (Corona is spreading) दररोज वीस हजारच्या वर रुग्णांचा आकडा गेल्यास लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिला आहे.

Mayor Kishori Pednekar
महापौर किशोरी पेडणेकर

By

Published : Jan 4, 2022, 1:36 PM IST

मुंबई: मुंबईत गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळा असे आवाहन केले जात आहे. लग्न मोठे कार्यक्रम यात नियम पाळले जात नाहीत. मुख्यमंत्र्यानी मोठे उत्सव टाळा असं सांगितलं आहे. मात्र त्याकडे राजकीय लोकांकडून दुर्लक्ष होत आहे. मुंबईत रुग्ण संख्या वाढत आहे यामुळे शाळा बंद केल्या आहेत असे महापौर म्हणाल्या.

तर मुंबईत लॉकडाऊन

मुंबईत रुग्ण संख्या वाढत असल्याने पालिका सज्ज असल्याचे आयुक्त सांगत आहेत. पालीकेने सर्व तयारी केली आहे. कोणालाही लॉकडाऊन नको आहे. नागरिकांनी नियम पाळायला हवेत. 20 टक्के रुग्ण आढळलेल्या इमारती आता सील होणार आहेत. तसेच रुग्णसंख्य 20 हजारावर गेली तर लॉकडाऊन लावावा लागेल. मुख्यमंत्री एक दोन दिवसात यावर बोलतील असे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा :Omicron Testing Kit : ओमीक्रॉनच्या निदानासाठी टाटा मेडिकलने तयार केली टेस्टिंग किट; ICMR ची मान्यता

ABOUT THE AUTHOR

...view details