मुंबई - 15 ऑगस्टला झेंडा विक्रीचा व्यवसाय जोमात असतो. यावर्षी कोरोनामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दरवर्षीप्रमाणे नसल्यामुळे तिरंग्यांची मागणी घटली आहे. त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे भायखळा येथील द फ्लॅग शॉपचे ग्यान शहा यांनी सांगितले.
15 ऑगस्ट विशेष : तिरंग्यालाही कोरोनाचा फटका; झेंडाविक्रीत प्रचंड घट - स्वातंत्र्यदिन २०२०
दरवर्षी उत्साहाने साजरा केला जाणारा स्वातंत्र्यदिन यावर्षी केवळ औपचारिकता म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सरकारी आदेश पाळून सण-उत्सव साजरे केले जात आहेत. यामुळे चौकाचौकात होणारे झेंडावंदन यावेळी रद्द करण्यात आले आहे. झेंड्याची मागणीदेखील घटली आहे.
कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. शाळेतील विद्यार्थी आणि शाळेत होणारे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमही रद्द झाले आहेत. दरवर्षी उत्साहाने साजरा केला जाणारा स्वातंत्र्यदिन यावर्षी केवळ औपचारिकता म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सरकारी आदेश पाळून सण-उत्सव साजरे केले जात आहेत. यामुळे चौकाचौकात होणारे झेंडावंदन यावेळी रद्द करण्यात आले आहे. झेंड्याची मागणीदेखील घटली आहे. सिग्नलवर, रस्त्यारस्त्यांवर या दिवसात झेंडे विकणारे छोटे विक्रेते दिसून येतात. यंदा मात्र तेही दिसत नाही. मोठे झेंडे विक्रेत्यांनी देखील यावेळी झेंडेनिर्मिती कमी केली आहे. यावेळी गृहनिर्माण संस्थांकडून झेंड्याची मागणी कमी झाली आहे. फक्त सरकारी कार्यालयात होणाऱ्या झेंडावंदनासाठी झेंड्याची मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.