मुंबई - कोरोना आणि लॉकडाउनचा इफेक्ट आता भाडेकरूंवर अर्थात लिव्ह अँड लायसन्सवरही दिसू लागला आहे. त्यानुसार आता भाडे करारातही लॉकडाउनशी संबंधित नवनवीन तरतुदी-नियम समाविष्ट केल्या जात आहेत. त्याप्रमाणे काहींनी लॉकडाउन काळात भाडे देणार नाही अशी तर काहींनी 50 टक्के भाडे देऊ, अशी भूमिका घेत तसे नियम समाविष्ट करून घेण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत प्रचंड लोकसंख्या असून या महागड्या शहरात हक्काचे घर घेणे परवडत नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकं भाड्याच्या घरात राहतात. त्याचवेळी कार्यालयाच्या तसेच व्यावसायिक जागाही मोठ्या संख्येने भाड्याने घेतली जाते. त्यासाठी लिव्ह अँड लायसन्स म्हणजेच भाडे करार करणे बंधनकारक असते. या भाडेकरारात विविध अटी-शर्थीचा समावेश असतो आणि त्याचे पालन भाडेकरू तसेच मालकाला करावे लागते.
आता मात्र कोरोना-लॉकडाऊनमुळे भाडेकरू आणि मालकांसमोर विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउमुळे अनेकांची काम बंद आहेत. तर अनेक जण मुंबई सोडून गावी गेले आहेत. तर दुसरीकडे छोटी-मोठी कार्यालये बंद आहेत. वर्क फ्रॉम होममुळे कार्यालयाची गरज कमी झाली आहे. त्यामुळे भाडेकरू भाडे देण्यास नकार देत आहेत. तर मालक भाडे वसुलीवर ठाम आहेत, अशी परिस्थिती पहिल्यादाच निर्माण झाल्याने आता यापूढे तरी असा पेच निर्माण होऊ नये यासाठी भाडे करारातच बदल करण्यात येत आहे.
भाडेकरारात नवीन नियमांचा समावेश -