महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut On Barsu Refinery Row : बारसूतील स्थानिकांचा शिंदे सरकारवर विश्वास नाही- संजय राऊत - Locals people of Barsu do not trust on Shinde govt

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर काही दिवसातच रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू येथील स्थानिकांचा महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारवर विश्वास नसल्याचे सांगितले. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना बारसू येथे जमीन खरेदी केलेल्या राजकारणी आणि बाहेरच्या लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी रिफायनरी प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप केला. शासनाने अशा लोकांची यादी जाहीर करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

Sanjay Raut On Barsu Refinery Project
संजय राऊत

By

Published : Apr 28, 2023, 4:38 PM IST

मुंबई:किनारी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांशी राज्य शासनाने संवाद साधावा, असे शरद पवार यांनी बुधवारी सांगितले. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर पर्यायी जागा शोधावी. कोकणातील विकास प्रकल्पांना त्यांचा पक्ष विरोध करत नाही; मात्र स्थानिकांचे मत जाणून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

'तो' गट प्रकल्पाच्या विरोधात: मुंबईपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू गावातील रहिवाशांचा एक गट या प्रकल्पाच्या विरोधात उभा आहे आणि त्यांना महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादीचे मित्रपक्ष शिवसेना (UBT) आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देत आहेत. राऊत म्हणाले की, नाणार येथे रिफायनरी उभारण्याची योजना रखडल्यानंतर केंद्राकडे पर्यायी जमिनीची मागणी सातत्याने होत असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणार नाही: दिल्लीच्या आग्रहावरून पर्यायी जमीन प्रस्तावित करण्यात आली; मात्र अडीच वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांना प्रकल्प नको असेल तर बारसूची (रिफायनरी प्रकल्प) गरज नाही, अशी आमची भूमिका आहे. ज्या प्रकारे स्थानिकांचा विरोध आहे आणि वातावरण आहे, सरकारने भूसंपादन आणि सर्वेक्षण थांबवावे. तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

बारसू विरोधात महिला आक्रमक: बारसूतील रिफायनरी विरोधी आंदोलनात आज रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची वाट अडवली. आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस बंदोबस्त बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. आता पोलीस या आंदोलकांवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे बारसू परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रिफायनरीचा मुद्दा अजून तापण्याची चिन्हे: रिफायनरी सर्वेक्षणविरोधातील आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. प्रशासनाने नागरिकांना समज दिली. तरीही नागरिक आंदोलनावर ठाम आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आज रिफायनरी मुद्दयावर पत्रकार परिषदही घेणार आहेत. या आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा अजून तापण्याची चिन्हे आहेत. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना सोमवारी राजापूरमध्ये अटक झाली. त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांना रत्नागिरीत ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा:Ramdas Athawale On Ajit Pawar :... तरी अजित पवारांना मुख्यमंत्री होता येणार नाही; आठवले का म्हणाले असे?

ABOUT THE AUTHOR

...view details