महाराष्ट्र

maharashtra

रेल्वे रूळावर पावसाचे पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 35 मिनिटे ठप्प

By

Published : Jun 12, 2021, 3:23 PM IST

दादर ते कुर्ला आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहे. तसेच खबरदारी म्हणून मध्यरेल्वेने दादर ते कुर्ला दरम्यानच्या सर्व लोकल सेवा बंद केली आहे.

mumbai local train news
रेल्वे रूळावर पावसाचे पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 35 मिनिटे ठप्प

मुंबई -रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्यरेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहे. दादर ते कुर्ला आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहे. तसेच खबरदारी म्हणून मध्यरेल्वेने दादर ते कुर्ला दरम्यानच्या सर्व लोकल सेवा बंद केली आहे. तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी दरम्यान लोकला स्पीड रिस्टिकशन देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रवासी लोकल गाड्यात अडकून पडले आहेत.

दादर ते कुर्ला लोकल सेवा बंद-

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे. सकाळपासून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. तरी सुद्धा रेल्वेच्या तिन्ही मार्गवर सकाळी 10 वाजेपर्यत वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मात्र, पावसाचा जोर वाढल्यामुळे रेल्वेच्या दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या जागीच खोळंबल्या आहेत. खबरदारी म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 12 वाजून 15 मिनिटांनी मध्य रेल्वेने दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद केली आहे. तसेच हार्बर मार्गावरील हार्बर मार्गावरील चुनाभट्टी दरम्यान लोकला स्पीड रिस्टिकशन देण्यात आले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवाही संथगतीने सुरू आहेत.

35 मिनिटानंतर वाहतूक सुरळीत-

रेल्वे रुळावर पाणीच साचल्याने मध्य रेल्वेने दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा 12 वाजून 15 मिनिटांनी बंद केली होती. मात्र, आता 12 वाजून 50 मिनिटांनी दादर ते कुर्ला स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल सेवा सुरू केली आहेत. आज पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल गाड्या रेल्वे स्थानकात आणून त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाण्यात अडकलेल्या लोकल गाड्यांमधून खाली उतरुन पाण्यातून वाट काढत प्रवाशांनी जवळचा रस्ता गाठण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - मुंबईत रात्रभर पाऊस, पुन्हा होऊ शकते मुंबईची तुंबई

ABOUT THE AUTHOR

...view details