महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या धास्तीने मुंबईच्या लोकलमधील गर्दी ओसरली - कोरोना व्हायरसचा प्रसार

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या व्हायरसचे रुग्ण मुंबईतही आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. या आवाहनाला मुंबईकर प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत असून, लोकमधील गर्दी ओसरल्याचे पाहायला मिळाले.

local trains Running empty amid corona outbreak
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकलमधील गर्दी ओसरली

By

Published : Mar 21, 2020, 12:53 PM IST

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या व्हायरसचे रुग्ण मुंबईतही आढळले आहेत. महाराष्ट्रात काल (शुक्रवार) कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. आज ही 63 झाली आहे. मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. या आवाहनाला मुंबईकर प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत असून लोकमधील गर्दी ओसरल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकलमधील गर्दी ओसरली

मुंबई आणि परिसरात नव्याने 10 रुग्ण आढळून आल्याने मुंबई परिसरातील रुग्णांची संख्या आता 31 झाली आहे. यामधील एका रुग्णाचा 17 मार्चला मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मुंबईमधील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व कार्यालये, कारखाने, दुकाने बंद करण्यात आली आहेत. मुंबईत बहुतेक सर्व व्यवहार बंद झाल्याने मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दीही कमी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details