मुंबई- गेल्या दोन दिवसापासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुबंईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवाही कोलमडली आहे. दरम्यान, आजही सुरू असलेल्या पावसामुळे सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन गेल्या चार तासांपासून विक्रोळी स्टेशनवरच अडकली आहे.
सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन चार तासांपासून विक्रोळी स्टेशनवरच - पावसाचा जो
घाटकोपर आणि विद्या विहार दरम्यान पाणी भरल्याने ट्रेन पुढे जात नाही. टिटवाळा येथून सीएसएमटी कडे निघालेली ट्रेन गेल्या चार तासापासून विक्रोळी स्टेशन येथे अडकली आहे.
सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन चार तासांपासून विक्रोळी स्टेशनवरच
घाटकोपर आणि विद्या विहार दरम्यान पाणी भरल्याने ट्रेन पुढे जात नाही. टिटवाळा येथून सीएसएमटी कडे निघालेली ट्रेन गेल्या चार तासापासून विक्रोळी स्टेशन येथे अडकली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.