महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध - मुंबई महानगरपालिका

मेट्रोसाठी 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तवाला गुरुवारी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. मात्र,आरेतील झाडे तोडण्याला स्थानिक आदिवासी नागरिकांनी विरोध केला आहे.

मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध

By

Published : Aug 30, 2019, 4:41 PM IST

मुंबई -आरे हा मुंबईमधील हिरवळीचा भाग असलेला प्रदेश आहे. मुंबई मेट्रोसाठी आरेतील झाडे तोडण्याला स्थानिक आदिवासी नागरिकांनी विरोध केला आहे.
मेट्रोसाठी 2238 झाडे तोडण्याच्या प्रस्तवाला गुरुवारी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली. मात्र, याला सत्ताधारी शिवसेनेने विरोध करत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज(शुक्रवार)आरेतील स्थानिकांनी मेट्रोसाठी झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

मेट्रोसाठी झाडे तोडण्याला आरेतील नागरिकांनी दर्शवला विरोध
आमच्या पिढ्यानपिढ्या आरेमध्ये वास्तव्याला आहेत. भातशेती व फळभाज्या लावून आम्ही उदरनिर्वाह करतो. हळूहळू सर्व झाडे तोडण्यात आली, तर आम्ही जगायचं कसे? असा प्रश्न आरेतील आदिवासी नागरिकांनी उपस्थित केला आहे.70 ते 80 वर्षे जुन्या आणि धोकादायक नसलेल्या झाडांवर मेट्रोसाठी कुऱ्हाड चालवणे योग्य नाही. आता मेट्रोकडून नव्याने लावण्यात आलेली झाडे ही हवेनेचं उन्मळून पडत आहेत. आमचा मेट्रो विकासाला विरोध नाही फक्त त्यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडू नये,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details