मुंबई - अवयवदानानंतर प्रत्यारोपणाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी, यासाठी अवयव रुग्णवाहिकेतून ग्रीन कॉरिडॉरद्वारे रुग्णालयापर्यंत पोहचवला जातो. मात्र अवयव प्रत्यारोपणासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातून एक यकृत परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये लोकलने आणण्यात आले. या प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जात आहे.
यकृत प्रत्यारोपण मुंबईच्या लाईफलाईनद्वारे - transfer
भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा
यकृत प्रत्यारोपण
प्रत्यारोपण लोकलद्वारे करण्यात येणार असल्याची सुचना डॉक्टरांकडून आरपीएफ व जीआरपी पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजून ४२ मिनिटांनी यकृत प्रत्यारोपण करणारी डॉक्टरांचा चमू दादर रेल्वे स्थानकावर आणण्यात आला. त्यानंतर दादरवरून ते यकृत परळच्या ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी रेल्वे जीआरपी, आरपीएफ व ट्राफिक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात आले.