मुंबई- १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट झाले. त्यामध्ये भाजप-सेनेला घवघवीत यश मिळाले आहे. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या मावळ, अहमदनगर , माढा या मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच गेल्यावेळी मोदी लाटेतही विजयी झालेल्या धनजंय महाडिक यांनाही पराभवाचे तोंड पाहावे लागले. आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनाही दारूण पराभव स्वीकारावा लागला. तर भाजपलाही चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांच्या रुपाने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे शिवसेनेतही केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना सुनिल तटकरे यांनी पराभूत केले.
या निकालामध्ये भाजपने २३ जागांवर विजय संपादन केला आहे. तर शिवेसेनेचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. आघाडीचा या निवडणुकीतही धुव्वा उडाला असून राष्ट्रवादीने यावेळीही ४ जागांवर विजय कायम राखला आहे. तर अमरावतीतील नवनीत राणा कौर यांच्या विजयासह राष्ट्रवादीच्या वाट्याला ५ जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसला मानहाणीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागणारं असे सध्यातरी दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे ५३ हजारांनी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या अहिरांचा पराभव केला. तर यावेळी राज्यात वंचित बहुजन आघाडीने (एमआयएम) दिल्लीच्या दरबारात औरंगाबादमधून १ खाते उघडले आहे.
भाजप -२३ (२०१४- २३)
शिवसेना - १८( २०१४-१८)
राष्ट्रवादी - ५ ( २०१४- ४)
काँग्रेस -०१ (२०१४-२)
एमआयएम -०१
विजयी उमेदवारांची यादी -
1. परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव विजयी
2. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी, राजू शेट्टी पराभूत
3. जालना मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयी
4. मुंबई दक्षिणमधून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
5. मुंबई उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजन विययी
6. नांदेडमधून भाजपचे प्रताप पाटील विजयी, अशोक चव्हाणांचा दारूण पराभव
7. बीड मतदारसंघातून प्रितम मुंडे विजयी, राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे पराभूत
8. सोलापूर मतदारसंघातून भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी, सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा धक्का
9. माढा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह निबाळकर विजयी; राष्ट्रवादीचे संजय शिंदे पराभूत
10. नंदुरबारमधून भाजपच्या डॉ. हिना गावित विजयी
11. अकोला मतदारसंघातून भाजपचे संजय धोत्रे विजयी
12. पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
13. रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी; निलेश राणे पराभूत
14. ठाणेमधून शिवसेनेचे राजन विचारे विजयी
15. रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे विजयी
16. जळगाव मतदारसंघातून भाजपचे उन्मेष पाटील विजयी, गुलाबराव देवकरांचा पराभव
17. अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे विजयी; राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांचा पराभव
18. शिर्डीमधून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी
19. धुळे मतदार संघातून सुभाष भामरे विजयी
20. मुंबई दक्षिण मध्यमधून शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी
21. मुंबई उत्तर पश्चिम शिवसेनेचे गजानन किर्तीकर विजयी
22. कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी; बाबाजी पाटलांचा पराभव
23. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांना पराभवाचा; शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी
24. मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मनोज कोटक विजयी
25. मुंबई उत्तर मधून भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी, उर्मिला मातोंडकरचा दारूण पराभव
26. कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी; राष्ट्रवादीच्या महाडिकांना पराभवाचा धक्का
27. शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे विजयी; शिवसेनेच्या आढळरावांचे पाणीपत
28. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे विजयी; केंद्रीय मंत्री गितेंना पराभवाचा धक्का
29. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी, भाजपच्या कांचन कुल पराभूत
30. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बहुसंख्य मतांनी विजयी, पटोलेंचा पराभव
31. वर्धा मतदारसंघातून भाजपचे रामदास तडस विजयी; चारुलता टोकसांचा केला पराभव
32. यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी विजयी; काँग्रेसचे ठाकरे पराभूत
33. सांगलीतून भाजपचे संजय पाटील विजयी झाले; त्यांनी पडळकर आणि विशाल पाटील यांचा पराभव केला.
34. अमरावतीमधून नवनीत राणा कौर विजयी; शिवसेनेच्या अडळूसांचा पराभव
35. औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी
36. गडचिरोली -चिमुर मतदारसंघातून अशोक नेते विजयी
37. रामटेक मतदारसंघातून कृपाल तुमाने विजयी
38. दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार विजयी
39. नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे विजयी; समीर भूजबळ पराभूत
40. उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी; राष्ट्रवादीचे राणा पराभूत
41. भिवंडी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील विजयी
42. चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर विजयी, केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांचा पराभव
43. लातूर मतदारसंघातून भाजपचे सुधाकर श्रृंगारे विजयी
44. हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी
45. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनिल मेढे विजयी
46. बुलडाणामधून शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी
47. पुणे मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट विजयी
48. सातारामधून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी
- 7.45- औरंगाबादमधून इम्तियाज जलील विजयी; शिवसेनेचे चंद्रकांत खैर पराभूत
- ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे विजयी, परांजपेंचा पराभव
- 06.30- रावेर मध्ये रक्षा खडसे विजयी
- 06.25 - नांदेडमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा पराभव; चिखलीकरांनी नांदेडात मारली बाजी
- धुळे मतदारसंघात सुभाष भामरे विजयी
- जालन्यातून रावसाहेब दानवे विजयी
- जळगावमध्ये भाजपचे उन्मेष पाटील विजयी
- 6.25 -अकोला मतदारसंघात संजय धोत्रे विजयी
- 06.20 -लातुरात भाजपचे उमेदवार श्रृगांरे विजयी
- 06.20 - सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी, सुशील कुमार शिंदे पराभूत
- सायं 06.10 - उस्मानाबादमध्ये १ लाख २६ हजार मतांनी ओमराजे निबांळकर विजयी; राणा जगजितसिंहाचा दारूण पराभव
- सायं 6.05- औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे २२२० मतांनी आघाडीवर
- सायं 06.00 -जालनामधून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयी
- दक्षिण मुंबईमधून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
- माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी; संजयमामा शिंदेंना पराभवाचा धक्का
- नंदुरबारमधून हिना गावित विजयी
- 05.10-दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विजयी
- 05.10- धुळे मतदारसंघातून सुभाष भामरे विजयी
- परभणी मतदारसंघातून संजय जाधव विजयी
- शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी
- शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ६३ हजार मतांनी विजयी
- दु. 3.13 - राष्ट्रवादी पुन्हा..! बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी; कांचन कुल यांचा १ लाख ५४ हजारांनी केला पराभव
- दुपारी 03.05- रायगड मतदारसंघातून अनंत गितेंचा पराभव, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे विजयी
- नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर
- शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंनी आढळरावांना दाखवले आसमान.,
- दुपारी 2.50 - पार्थ पवारांना पराभवाचा धक्का; मावळमधून श्रीरंग बारणे विजयी
दुपारी २ वाजेपर्यंतचे हाती आलेले मतदानाचे कल
- रायगडमध्ये सुनिल तटकरेची ८ हजार २३५ मतांची आघाडी
- सांगलीमध्ये भाजपचे संजय पाटील याची ६३ हजार ९४१ मतांची आघाडी
- रामटेकमध्ये कृपाल तुमाने ९ हजार ३७० मतांची आघाडी
- वर्धामध्ये तडस यांची ३४ हजार १९४ मतांची आघाडी
- परभणीमध्ये संजय जाधव २६ हजार ४८१ मतांनी आघाडीवर
दुपारी १.४५ वाजेपर्यंतची आकडेवारी
- जळगावमध्ये १५ व्या फेरी अखेर भाजपच्या रक्षा खडसे १ लाख ७८ हजार मतांनी आघाडीवर
- रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे ५ हजार २६१ आघाडीवर
- औरंगाबादमध्ये वंचितचे जलील २४ हजार ३८०ने आघाडीवर
- बारामतीमध्ये सुळे १ लाख २१ हजार ७०२ आघा़डीवर
- उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर ८२ हजार १९७ आघाडीवर
- नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित ८१ हजाराने आघाडीवर
- वर्धामध्ये रामदास तडस ४६ हजार १३३ मतांनी आघाडीवर
- परभणीमध्ये संजय जाधव २५ हजारांनी आघाडीवर
- नंदुरबारमध्ये केसी पडवी ८१ हजार २९७ मतांनी आघाडीवर
- भिवंडीमध्ये कपिल पाटील ४३ हजार मतांनी आघाडीवर
- लातूरमध्ये भाजपचे श्रृगांरे ८६ हजार मतांनी आघाडीवर
- चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर ६ हजार ७७६ मतांनी पिछाडीवर
दुपारी १.30 मिनिटापर्यंत हाती आलेली आकडेवारी
- रायगडमध्ये सुनिल तटकरे ३७८८ आघाडीवर
- शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे ९३ हजार ४६६ मतांनी आघाडीवर
- नागपूरमध्ये नितीन गडकरी ५८ हजार मतांनी आघाडीवर
- सातारा उदयनराजे भोसले ५५ हजार ३३९ मतांनी आघाडीवर
- रामटेक मध्ये कृपाल तुमाने १० हजार १६७ मतांनी आघाडीवर
- गडचिरोलीमध्ये अशोक नेते ५३ हजार २६२ मतांनी आघाडीवर
- यवतमाळ सहाव्या फेरीमध्ये भावना गवळी १३हजार ६८८ मतांनी आघाडीवर
- दिंडोरीमध्ये सहाव्या फेरी अखेर भारती पवार ६० हजार ३४२ मतांनी आघाडीवर
- 1.27 - यवतमाळ मतदार संघात भावना गवळी २७ हजार मतांनी आघाडीवर आहेत
- उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी १ लाख ७२ हजार मतांनी आघाडीवर
- रावेरमध्ये रक्षा खडसे १ लाख ३० मतांनी आघाडीवर
- अशोक चव्हाण २० हजार मतांनी पिछाडीवर
- हिंगोलीत हेमंत पाटील ५७ हजार मतांनी आघाडीवर
- चंद्रपूरमध्ये धानोरकर ६हजार ५०० मतांनी आघाडीवर
- 01.15- नाशिकमध्ये भाजप उमेदवार हेमंत गोडसेंची ३२ हजार मतांनी आघाडी
- जालनामध्ये रावसाहेब दानवे ८२ हजार मतांनी आघाडीवर
- अमरावतीमध्ये नवनित राणा कौर यांची ८ हजार ९१३ मतांची आघाडी
- औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील २३ हजार मतांनी आघाडीवर
- गडचिरोलीत अशोक नेते ४९ हजार मतांनी आघाडीवर
- कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे १ लाख १९ हजार ६२८ मतांनी आघाडीवर