महाराष्ट्र

maharashtra

Grampanchayat Result 2022 Live : ग्रामपंचायतच्या निकालानंतर दोन गट भिडले; विजयी उमेदवाराचा मृत्यू

By

Published : Dec 20, 2022, 9:19 AM IST

Published : Dec 20, 2022, 9:19 AM IST

Updated : Dec 20, 2022, 7:10 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूक

19:08 December 20

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; चुरशीच्या लढतीत ईश्वरचिठ्ठीने ठरवले तीन उमेदवारांचे भवितव्य

जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गराडा गावात दोन सख्ख्या मावस जावा एकमेकांसमोर ग्रामपंचायत निवडणूक ( Gram Panchayat Election Results ) रिंगणात आमनेसामने होत्या. उध्दव ठाकरे गटातून पूजा सचिन राठोड तर एकनाथ शिंदे गटातून रेश्मा राहुल राठोड निवडणूक लढल्या. दोघींना ही 540 अशी समान मत पडली. त्यावेळी ईश्वर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोघांच्या नावाने ईश्वरचिठ्ठी ( Lucky Draw decided ) टाकण्यात आली त्यात उध्दव ठाकरे गटाच्या पूजा राठोड विजयी झाल्या.

19:08 December 20

ग्रामपंचायतच्या निकालानंतर दोन गट भिडले; विजयी उमेदवाराचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात 122 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून या निवडणुकीच्या निकालाला जामनेर मध्ये मात्र गालबोट लागले आहे. टाकळी येथे विजयी उमेदवार गावातील मंदिरावर देव दर्शनासाठी जात असताना गावातील दोन गट भिडले व या दरम्यान झालेल्या हाणामारी व दगडफेकीत विजयी पॅनलच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

18:37 December 20

लोहा तालुक्यांतील पळशी येथील ऊसतोड महीला कामगार झाली सरपंच

नांदेड - जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या पळसी गावात ऊसतोड महीला कामगाराला सरपंच पदाचा मान मिळाला.. राजश्री गोटमूळके ह्या मोलमजुरी आणि ऊसतोडीचे काम करतात .. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले .. सरपंचपदाची निवडणुक लढवण्याचा निर्णय राजेश्री गोटमुक्ले यांनी घेतला . आणि त्या निवडून पण आल्या . त्यांना 350 मत मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संगीता गोटमूळके यांना 180 मते मिळाली .

17:52 December 20

बुलढाणा जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायत पैकी 254 सरपंचाचे अंतिम निकाल हाती आले आहे

बुलढाणा - निकालमध्ये सर्वाधिक 68 जागा शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना यांना मिळाल्या आहे.तर भाजपचे 49,राष्ट्रवादीचे 32,काँग्रेसचे 22 आणि इतरमध्ये 90 सरपंच पदाचे निकाल घोषित झाले आहे.दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिंदे गटाचा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष निकालातून समोर आला आहे.याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून उर्वरित 7 ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी उमेदवार न मिळाल्याने हे 7 पद रिक्त आहे.

17:51 December 20

बीड मतदारसंघातील 80 टक्के ग्रामपंचायतीत आमचा विजय; माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा दावा

बीड - मतदार संघातील 132 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 80 टक्के ग्रामपंचायतींवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दावा केला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी, शिक्षण संस्थामधील शिक्षक प्रचारासाठी वापरल्याच्या आरोपावर देखील, जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलय. ते म्हणाले, की विकास काहीच करता येत नाही म्हणून टीका टिप्पणी करतात. शिक्षकांना शाळेच्या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा कायद्याने प्रचार करता येतो. त्यामुळं हे टोल गोळा करणारे आहेत. असं म्हणत संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागरांनी टोला लगावला आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयासंदर्भात दावेप्रति दावे केले जात असताना, क्षीरसागर काका पुतण्यांमध्ये मात्र चांगलीचं जुंपल्याच चित्र बीडमध्ये पाहायला मिळाले.

17:15 December 20

भाजी विक्री करणारा आता थेट सरपंच पदाच्या खुर्चीवर बसणार; शाहुवाडीतील तरुणाची सर्वत्र चर्चा

कोल्हापूर : आज ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये जिल्ह्यात एकूण 473 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती आले आहेत. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले असून अनेकांनी दिग्गजांना घाम फोडत विजेतेपद खेचुन आणले आहे. अशीच एक घटना कोल्हापूरातल्या शाहूवाडी तालुक्यातील गावात घडली आहे. एक भाजी विक्रेता ते सरपंच पदापर्यंत पोहोचण्याचा पराक्रम इथल्या उच्चशिक्षित तरुणाने केली आहे. येथील बांबवडे बाजारपेठेत भाजी विक्री करणारा तरुण आता थेट वरेवाडी गावातील ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या खुर्चीवर बसणार आहे.

17:14 December 20

पाच पक्ष एकत्र येत तरीही शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा विजय

बीडआज मतमोजणी चालू आहे आणि याच मतमोजणीच्या दरम्यान अनेक पक्षाचे लोक दावेप्रति दावे करत आहेत परंतु भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे गट व ठाकरे गट यांच्याकडे किती ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात गेले आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र मंत्री आणि आमदार मात्र दावे करत आहेत की हे या ग्रामपंचायती आमच्या आहेत तर एक शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्या विरोधात मात्र पाच जणांनी एकत्र येत निवडणूक लढली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक होती मात्र कशा पद्धतीने याचा निकाल लागतोय हेच पाहणं अवचित याचं ठरणार आहे.

17:13 December 20

पनवेलमध्ये शेकाप महाविकास आघाडी चारीमुंडया; सहा ग्रामपंचायतीवर विजय मिळवत भाजप सरस

पनवेल तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषतत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापक्षाच्या ताब्यातील करंजाडे, शिवकर, भाताण ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले आहे.

16:33 December 20

पालघर जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती

भाजप - 11

राष्ट्रवादी - 4

बहुजन विकास आघाडी - 13

उ.बा . ठाकरे - 7

बाळासाहेबांची शिवसेना - 2

मनसे - 3

अपक्ष - 22

इतर - 1

16:32 December 20

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा भंडारा

एकुण ग्रामपंचायत- 135

शिवसेना - 00

शिंदे गट - 10

भाजप- 25

राष्ट्रवादी- 23

काँग्रेस- 25

इतर-52

16:32 December 20

येवला ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व

येवलातालुक्यातील नांदेसर, कोटमगाव बुद्रुक, आडगाव चोथवा,नायगव्हाण, कुसुर, चांदगाव, एरंडगाव खुर्द या सात ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे. तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वर्चस्व बघायला मिळाले असून सात पैकी तीन ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट वर्चस्व मिळवत एका ग्रामपंचायतीवर भाजप तर इतर ग्रामपंचायतवर सर्व पक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

15:43 December 20

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व; ४२ पैकी २० ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी ३४ ग्रामपंचायतीमध्ये ११४ उमेदवारांसह २१९ सदस्यांच्या जागांसाठी ६१३ उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे ४२ पैकी ६ ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्या रिक्त आहेत. आज अंतिम निकालात सर्वाधिक २० ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून आले. तर शिंदे गटाचे १३ पॅनल, तसेच ठाकरे गटाचे ५ तर २ ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

15:43 December 20

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द येथे भाजपाचे र्निविवाद वर्चस्व

जालना - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात 30 वर्षानंतर दानवेंचं वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांच्या भावजई सुमन मधुकर दानवे यांना यश आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या सुनिता संतोष दानवे यांचा दणाणून पराभव करत आपली परंपरा कायम ठेवत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवत 30 वर्षाची परंपरा कायम ठेवत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.

15:43 December 20

पुण्याच्या मावळमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का, NCP 6 तर BJP 3 ठिकाणी विजयी

पुण्याच्या मावळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. मावळमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नऊ पैकी शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली तिथं राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा रोवला. आठ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ यश मिळालं आहे. तर,भाजपा केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. मावळमधील भोयरे आणि निगडी या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या उमेदवाराला प्रचार केला होता. पैकी भोयरे येथे त्यांना विजय मिळाला तर निगडी येथे पराभव झाला आहे.

15:17 December 20

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल

एकूण जागा 447 / 204 निकाल

भाजप - 46

ठाकरे गट -1

शिंदे गट - 27

राष्ट्रवादी - 42

कॉग्रेस - 30

बिनविरोध - 38

स्थानिक आघाडी - 20

15:17 December 20

नंदुरबार जिल्हा ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

नंदुरबार जिल्हा ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा :- नंदूरबार

निकाल जाहीर :- १०९

एकुण ग्रामपंचायत- १२३

शिवसेना - १०

शिंदे गट - १२

भाजप- २८

राष्ट्रवादी- ०३

काँग्रेस- २५

ठाकरे गट + शिंदे गट २४

मविआ - १

इतर-०६

15:11 December 20

नाशिक जिल्ह्यात ठाकरे,शिंदे गटासह राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व

नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 196 ग्रामपंचायत पैकी आठ ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे,त्यामुळे 188 ग्रामपंचायतीची निवडणूक मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली,आज मतमोजणी झाली असून यामध्ये ठाकरे, शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहील.

नाशिक तालुका निकाल

1- महिरवणी - कचरू वागळे- शिंदे गट मालती 2 2-तळेगाव-रवींद्र निंबेकर-ठाकरे गट

3- बेलगावढगा-शरद मांडे -

4-यशवंत नगर-अगस्ती फडोळ-भाजप

5-गिरणारे-किरण कोरडे-शिंदे गट कविता 6-सामनगाव-कविता जगताप- ठाकरे गट

7-ओढा-प्रिया पेखळे-ठाकरे गट

8-देवरगाव-पार्वता पिंपळके- कॉग्रेस

9-लाडची-लेखा कळाले-अपक्ष

10-एकलहरे -अरुण दुशिंगे -भाजप

11-गणेश गाव-मालती डहाळे-ठाकरे गट

12-दुडगाव -एकनाथ बेझेकर-ठाकरे गट

13-साडगाव-सुरेश पारधे-राष्ट्रवादी

सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत निकाल

1-कारवाडी -रूपाली जाधव- ठाकरे सेना

2-कृष्ण नगर- दत्तू गोफणे-ठाकरे सेना

3-आशापुर -सुलोचना-सिताराम पालवे

4-शास्त्रीनगर -जयश्री लोणारे-ठाकरे सेना

5-नांदूर शिंगोटे शोभा बरके ठाकरे सेना

6-पाटपिंपरी- नंदा गायकवाड-राष्ट्रवादी

7-शहा -संभाजी जाधव -राष्ट्रवादी

8-ठाणगाव- नामदेव शिंदे तायडे-ठाकरे सेना

9-सायळे-विकास शेंडगे- ठाकरे सेना

10-उजनी-निवृत्ती सापनकर-राष्ट्रवादी

11-वडगाव पिंगळा- शेवंताबाई मुठाळ- ठाकरे सेना

नांदगाव तालुका ग्रामपंचायत निकाल

1-हिरेनगर-मंगल बिंनर- शिंदे गट

2-धोटने-शरद काळे-शिंदे गट

3-भारडी-अनिता मार्कंड- राष्ट्रवादी काँग्रेस

4-लक्ष्मीनगर-मीराबाई उगले -शिंदे गट

5-नांदगाव लोढरे-ज्योती निकम-शिंदे गट

6- नांदगाव बोरगाव- बबन शेरमाळे-शिंदे गट

निफाड तालुका पंचायत निकाल

1-निमगाव वाकडा- पूजा दरेकर -राष्ट्रवादी काँग्रेस 2-पिंपळगाव ब-भास्कर बनकर- ठाकरे गट

3-थेटाळे- शितल शिंदे- राष्ट्रवादी

4-तारुखेडले -अनुसया आंधळे- शिवसेना गट 5-खामगाव थंडी- भाऊसाहेब दौंड- भाजप

6-खडक माळेगाव -जगदीश पवार- अपक्ष

7-नदारडी- जयश्री जाधव -राष्ट्रवादी

8-कोटमगाव -आरती कराळे -भाजप

9-लोणवाडी इंदुबाई साळवे राष्ट्रवादी

10-बोकडदरे- विजय सानप- राष्ट्रवादी

11-कजबे सुकाने-आनंदा भंडारे-अपक्ष 12-कोकणगाव -सुरेखा मोरे ठाकरे सेना

13-पिंपळस -निशा ताजने- भाजप

14-मांजरगाव- वंदना सोनवणे -अपक्ष

15-साकोरे मिग-शोभा बोरस्ते -राष्ट्रवादी

16-शिंगवे- सुशिला पवार -अपक्ष

17-सोनेवाडी खुर्द -नंदा आव्हाड -राष्ट्रवादी 18)-धारणगाव- वीर सोनवणे-राष्ट्रवादी

कळवण तालुका ग्रामपंचायत निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व 18 पैकी 14 ग्रामपंचायतवर थेट सरपंच निवड..

15:11 December 20

कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे : आदित्य ठाकरे

नागपूर- ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणी खोके वाटतंय तर कुणी पेढे अशी टीका केली. विद्यमान सरकार केवळ 40 गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. सीमावादावर राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री या मुद्यावर आक्रमक असताना दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलायला देखील तयार नाही,असे पहिल्यांदाच होत आहे. जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटायला हवा तो रस्त्यावर मांडण्यात येत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

14:02 December 20

आम्हाला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर विधानसभेत चर्चा हवी-आदित्य ठाकरे

आम्हाला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर विधानसभेत चर्चा हवी आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे जाणून घ्यायचे आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री या मुद्द्यावर आक्रमक आहेत, पण भीतीपोटी आमचे मुख्यमंत्री यावर बोलू इच्छित नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

13:56 December 20

आंबेगाववर पुर्णपणे राष्ट्रवादीचे वर्चस्व

आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे(एनसीपी) ग्रामपंचायत निकालावर पुर्णपणे वर्चस्व राहिले आहे. २१ पैकी १९ जागी राष्ट्रवादी विजयी झाली आहे.

घोडेगाव -एनसीपी

साल - उध्दव गट शिवसेना

आंबेदरा - एनसीपी

आमोंडी - एनसीपी

गंगापुर खुर्द - एनसीपी

चिंचोडी - शिवसेना शिंदे गट

चांडोली - एनसीपी

कळंब - एनसीपी

पारगांव तर्फे खेड - एनसीपी

मेंगडेवाडी - एनसीपी

धामणी - एनसीपी/शिंदे गट

भावडी - एनसीपी

नारोडी - एनसीपी

गोहे खुर्द - एनसीपी

निघोटवाडी - एनसीपी

रांजणी - एनसीपी

बिनविरोध

नागापुर - एनसीपी

डिंभे खुर्द - एनसीपी

आहुपे - एनसीपी

तळेघर - एनसीपी

चिखली - एनसीपी

राष्ट्रवादी 21 पैकी 19 जागांवर विजयी

13:31 December 20

चंदगड तालुक्यातील शिनोळीमध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव

चंदगड तालुक्यातील शिनोळीमध्ये शिंदे गटाचा दारुण पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि भरमु सुबराव गटाने गावातील शिंदे गटाची सत्ता उलथवून लावली.

एकूण 9 पैकी 7 जागा जिंकत राजेश पाटील आणि भरमु सुबराव यांनी गावातील सत्तेला दिला हादरा

शिणोळी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता प्रचार..

शंभूराज देसाई निवडणुकीत प्रचार केल्याने सर्वांच्या नजरा या निवडणुक निकालाकडे लागल्या होत्या..

शिनोळी गाव बेळगावला लागून आहे.

13:29 December 20

शिंदे गटाने खोलले खाते, राष्ट्रवादीची भंडारामध्ये सरशी

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे 305

जिल्हा भंडारा

एकुण ग्रामपंचायत- 72

शिवसेना - 00

शिंदे गट - 10

भाजप- 15

राष्ट्रवादी- 17

काँग्रेस- 15

इतर-15

12:46 December 20

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा - नांदेड

एकुण ग्रामपंचायत- 179

शिवसेना - 08

शिंदे गट - 04

भाजप- 16

राष्ट्रवादी- 06

काँग्रेस- 21

इतर- 25

12:46 December 20

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी होमपीच राखले

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी होमपीच राखले

वळके ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

सामंत यांच्या रत्नागिरी मतदार संघात शिंदे गट आघाडीवर

12:45 December 20

मुरबाड तालुक्यात कोणता पक्ष आघाडीवर?

मुरबाड तालुका मतमोजणी अपडेट* एकूण - 14 ( बिनविरोध-3 )

भाजप - 3

ठाकरे गट -

शिंदे गट - 4

एनसीपी - 0

काँग्रेस- 0

मनसे - 0

इतर -

12:39 December 20

ईव्हीएम वर 408 मतदान, मतमोजणीत झाले 411 मतदान

पुणे हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील सरपंच पदाच्या मतमोजणीत 411 मतदान झालं असताना ईव्हीएम वर 408 मतदान झाला आहे.असे दाखविल जात आहे. यामुळे 3 मते आली कुठून हा प्रश्न भैरवनाथ विकास पॅनल सरपंच पदाचे उमेदवार अनिल काळे यांनी उपस्थित केला आहे. हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भैरवनाथ विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार अनिल काळे यांनी ईव्हीएम वर थेट आक्षेप नोंदविला आहे.

12:34 December 20

धनंजय मुंडे पाठोपाठ पंकजा मुंडे यांनीही ग्रामपंचायतीच्या विजयावर केला दावा

बीडसह परळी मतदारसंघातील ग्रामपंचायतवर धनंजय मुंडे पाठोपाठ पंकजा मुंडे यांनीही ग्रामपंचायतीच्या विजयावर दावा केला आहे.

12:31 December 20

असा आहे अकोला ग्रामपंचायत निवडणूक

अकोला ग्रामपंचायत निवडणूक-

- वंचित बहुजन आघाडी- 27

-भाजप- 07

-शिवसेना(ठाकरे गट)- 03

- शिवसेना( शिंदे गट)-

- राष्ट्रवादी- 01

-काँग्रेस- 01

-मनसे- 01

- इतर-26

12:28 December 20

असा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा-- रत्नागिरी

एकूण ग्रामपंचायत- 222

बिनविरोध - 66

शिवसेना - 37

शिंदे गट - 09

भाजप- 05

राष्ट्रवादी- 02

काँग्रेस- 00

इतर-13

एक ग्रामपंचायतीसाठी कोणीही अर्ज केला नाही

मतदान ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा-- रत्नागिरी

एकूण ग्रामपंचायतीत निवडणूक-

155 ग्रामपंचायतीसाठी आहे

शिवसेना ठाकरे गट- 24

शिवसेना शिंदे गट - 18

भाजप- 8

राष्ट्रवादी- 2

काँग्रेस- 1

इतर- 6

------

मविआ- 27

शिंदे गट-भाजप-26

इतर - 6

12:26 December 20

असा आहे गगनबावडा तालुक्याती ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

गगनबावडा तालुका 21 ग्रामपंचायत निवडणूक

कॉंग्रेस 6 ठिकाणी बिनविरोध तर शिवसेना 1 एक बिनविरोध

10 ग्रा.प. निकालापैकी 8 कॉग्रेस,

शिवसेना 1, स्थानिक आघाडी 1

युवराज कदम, बावेली सरपंच काँग्रेस

भरती कांबळे, शेलोशी सरपंच काँग्रेस

रेश्मा परीट, कडवे सरपंच काँग्रेस

सरिता पाटील, निवडे सरपंच काँग्रेस

राजाराम पाटील, मांडूकली सरपंच काँग्रेस

केरबा दादू पाटील, तळे बुद्रुक सरपंच काँग्रेस

किरण कांबळे, साखरी सरपंच काँग्रेस

सुनिता भिमराव कांबळे, खोकुर्ले सरपंच काँग्रेस

हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली

ईव्हीएम वर 411 मतदान झाला असताना 408 मतदान दाखवत आहे

मतमोजणी थांबवण्यासाठी पिंपरी सांडस ग्रामस्थांचा आक्षेप...अनिल काळे सरपंच पदाचे उमेदवार...भैरवनाथ विकास पॅनल

12:02 December 20

कल्याण तालुक्यातील ९ ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे शिंदे गटाला समान जागा

कल्याण तालुक्यातील ९ ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे शिंदे गटाला समान जागा

दिलीप पाळवी - ठाकरे गट ( कोसले )

शरद मंगल दिवाणे - ठाकरे गट ( गेरसे )

अरुण शेलार - शिंदे गट ( नांदप )

अलका शेलार - भाजप ( कुंदे )

रुचिरा देसले - शिंदे गट ( वेलहे )

अपेक्षा अनिल चौधरी- शिंदे गट ( पळसोळी )

वनिता जाधव - इतर ( वासुंद्री )

( वसतशेलवली )

महेश अशोक चौधरी बिनविरोध - ठाकरे गट ( काकडपाडा )

● कल्याण तालुका मतमोजणी अपडेट ( बिनविरोध - 1 )

भाजप - 1

ठाकरे गट - 3

शिंदे गट - 3

एनसीपी - 0

काँग्रेस- 0

मनसे - 0

इतर - 1

एकूण - 9

11:49 December 20

कोन गाव ग्रामपंचायतमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तनने मारली बाजी

ठाणे जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायत पैकी सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या भिवंडी तालुक्यातील कोन गाव ग्रामपंचायतमध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनल बाजी मारली. या पॅनलच्या रेखा पाटील निवडून आल्या, विशेष म्हणजे या ग्रामपंचायतमध्ये भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होऊन रेखा पाटील या विजय झाल्या आहेत.

11:47 December 20

सख्ख्या मावस जावांना एकसमान मते, अखेर चिठ्ठी काढून घेण्यात येणार कौल

सख्ख्या मावस जावांना एकसमान मते मिळाली आहेत. अखेर चिठ्ठी काढून कौल घेण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गराडा गावात हा निवडणूक निकाल आहे.

11:44 December 20

आमदार संदीप क्षीरसागर यांचा काका जयदत्त क्षिरसागर यांना धक्का

आमदार संदीप क्षीरसागर यांचा काका जयदत्त क्षिरसागर यांना धक्का, नवगण राजुरी ग्रामपंचायतवर एक हाती सत्ता मिळविली आहे.

11:41 December 20

असे आहेत भिवंडी ग्रामपंचायतीचे निकाल

ग्रामपंचायत 14

बिनविरोध 1

मतदान झालेल्या - 13

भाजप – 2

ठाकरे गट –

शिंदे गट – 3

राष्ट्रवादी

कॉग्रेस

इतर.

बिनविरोध 1 शिंदे गट

एकूण निकाल – 14 पैकी 5

भाजप - कोपर , कांबे

शिंदे - कशेळी ,खानिवली , कासने

ठाकरे -

भिवंडी ग्रामपंचायत निकाल

ग्रामपंचायत 14

बिनविरोध 1

मतदान झालेल्या - 13

भाजप – 3

ठाकरे गट –

शिंदे गट – 3

राष्ट्रवादी

कॉग्रेस

इतर.

बिनविरोध 1 शिंदे गट

एकूण निकाल – 14 पैकी 5

11:27 December 20

करवीर तालुक्यात कोण जिंकले ?

हिरवडे खालसा काँग्रेसचे शेकापचे नदीफ मुजावर हे विजयी

गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे विजयी

सावर्डे तुम्हालाच काँग्रेसचे भगवान रोटे विजयी

सडोली दुमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी

कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी

चिंचवडे तर्फ कळे मध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी

हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी

सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील विजयी

सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ विजयी

पाडळी बुद्रुक येथे स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड विजयी

परितेत काँग्रेसचे मनोज पाटील विजयी

वरणगेत स्थानिक आघाडीचे युवराज शिंदे विजयी

दिंडनेर्ली त स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे विजयी

कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील विजयी

नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर हे विजयी

सादळे मादळे स्थानिक आघाडीचे पंडित बिडकर विजयी

वळिवडेत काँग्रेसच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे विजयी

प्रयाग चिखलीत भाजपचे रोहित रघुनाथ पाटील विजय

11:26 December 20

वेल्हे तालुक्यात सहा ग्रामपंचायत काँग्रेसकडे

वेल्हे तालुक्यात सहा ग्रामपंचायत काँग्रेसकडे

दापोडे

शिरकोली

लवी

सोंडे हीरोजी

वाजेघर

कोंडगाव

भोर वेल्हा मुळशी तालुक्यात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना पुन्हा एकदा तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात यश

11:24 December 20

असा आहे औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल

औरंगाबाद

ठाकरे गट 9

शिंदे गट 15

भाजप 16

काँग्रेस 02

राष्ट्रवादी 4

इतर 7

216/ 53

216 पैकी 53 निकाल आलेत

11:23 December 20

हवेली तालुक्यातील भुरके गाव भाजपच्या हाती

हवेली तालुक्यातील भुरके गाव भाजपच्या हाती

रूपाली रूपाली संदीप थोरात सरपंच पदी निवड...

1 दापोडे तालुका वेल्हा पुणे जिल्हा या ठिकाणी सरपंच काँग्रेस 2 शिरकोली ग्रामपंचायत काँग्रेसकडे 4 सोंडे हिरोजी ग्रामपंचायत काँग्रेसकडे

11:21 December 20

गांधीनगर ग्रामपंचातीत आमदार सतेज पाटलांना धक्का

गांधीनगर ग्रामपंचातीत आमदार सतेज पाटलांना धक्का

महाडिक गटाचे संदीप पाटोळे हे सरपंच पदाचे उमेदवार विजयी

गांधीनगर ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

गांधीनगर भाजपची सत्ता कायम राखण्यात महाडिक गटाला यश

आमदार सतेज पाटील यांचा सत्तांतराचा प्रयत्न अयशस्वी

शिरोळ तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व कायम

एकूण 17 पैकी 11 ठिकाणी शिंदे गटाची सत्ता

राजेंद्र पाटील यड्रावकरांनी गड राखला

भाजपला दोन, काँग्रेसला दोन , अपक्ष 2

11:16 December 20

असा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निकाल

जिल्हा-- रत्नागिरी

एकुण ग्रामपंचायत- 222

बिनविरोध - 66

शिवसेना - 37

शिंदे गट - 09

भाजप- 05

राष्ट्रवादी- 02

काँग्रेस- 00

इतर-13

एक ग्रामपंचायतीसाठी कोणीही अर्ज केला नाही

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा-- रत्नागिरी

एकुण ग्रामपंचायतीत निवडणूक- 155 ग्रामपंचायतिसाठी आहे

शिवसेना ठाकरे गट- 8

शिवसेना शिंदे गट - 17

भाजप- 1

राष्ट्रवादी- 2

काँग्रेस- 1

इतर- 4

11:16 December 20

भंडारामध्ये राष्ट्रवादी चार भाजप चार जागावर

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे 305

जिल्हा भंडारा

एकुण ग्रामपंचायत- 12

शिवसेना - 00

शिंदे गट - 00

भाजप- 04

राष्ट्रवादी- 04

काँग्रेस- 01

इतर-03

11:15 December 20

बुलढाणामध्ये भाजप आघाडीवर

ग्रामपंचायतचा निकाल खालीलप्रमाणे

जिल्हा-- बुलढाणा

एकुण ग्रामपंचायत- 279

शिवसेना - 2

शिंदे गट - 10

भाजप- 11

राष्ट्रवादी- 9

काँग्रेस- 5

इतर- 8

11:01 December 20

औरंगाबादमध्ये शिंदे गट आघाडीवर

औरंगाबादमध्ये शिंदे गट आघाडीवर

ठाकरे गट 3

शिंदे गट 9

भाजप 5

काँग्रेस 00

राष्ट्रवादी 2

इतर 2

216/21

216 पैकी 21 निकाल आलेत

10:48 December 20

हवेली तालुक्यात पहिला निकाल ठाकरे गटाच्या बाजुने

आव्हाळवाडीतील वार्ड क्रमांक 1 मधून सेनेचे प्रशांत रघुनाथ सातव, सोनाली दाभाडे विजयी

अहिरे ग्रामपंचायत निवडणूक निकाल.....

अहिरे ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे

आरती वांजळे सरपंच पदी विजय

10:24 December 20

एका मताने सरपंच पराभूत

ग्रामपंचायत निवडणूक निकाल वडकशिवाले

भाजपचे विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे यांचा 1 मताने पराभव

राष्ट्रवादीच्या जयवंत शिंदे यांचा 1 मताने विजय

10:16 December 20

नंदूरबारमध्ये शिंदे गटाची तीन ग्रामपंचायतीवर सत्ता

ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे

जिल्हा - नंदूरबार

एकुण ग्रामपंचायत- १२३

शिवसेना - ०२

शिंदे गट - ०३

भाजप- ०२

राष्ट्रवादी- ००

काँग्रेस- ०३

10:15 December 20

कोल्हापुरात भाजपची आघाडी

कोल्हापुरात भाजपची आघाडी

10:14 December 20

नाशिकमध्ये भाजपने उघडले खाते

नाशिकमध्ये भाजपने उघडले खाते,

अहमदनगरमध्ये १७ ग्रामपंचायतीचा निकाल

10:08 December 20

नाशिक देवळाली तालुक्यातील ४ ग्रामपंचायती भाजपकडे

नाशिक देवळाली तालुक्यातील ४ ग्रामपंचायती भाजपकडे

उस्मानाबाद जिल्ह्यात कसबे तडवळे राष्ट्रवादी तर कावळेवाडी आपकडे

09:54 December 20

खिद्रापूरमध्ये अपक्ष उमेदवार बनल्या सरपंच

अब्दुललाट : सरपंच पदासाठी कस्तुरी वसंत कुरुंदवाडे, महा विकास आघाडी, काळे गट

अकिवाट : वंदना सुहास पाटील सरपंच पदी विजयी, स्थानिक बैरागदार गट

टाकवडे : सविता मनोज चौगुले सरपंच पदी विजयी, स्थानिक अमोल चौगुले गट

खिद्रापूरमध्ये अपक्ष उमेदवार बनल्या सरपंच

सारिका कुलदीप कदम खिद्रापूरच्या सरपंच

09:49 December 20

दोन जिल्ह्यांत भाजपने मारली मुसंडी

उस्मानाबाद तुळजापूरमध्ये चार ठिकाणी भाजपची सत्ता

सोलापूर जिल्ह्यात ८ ग्रामपंचायीतवर भाजपचा विजय

09:40 December 20

आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पहिला निकाल

चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा

सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी

09:29 December 20

कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार फाईट

बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा

कागल तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच

26 पैकी 12 सरपंचपदाचे निकाल

राष्ट्रवादी 04

भाजप 04

शिंदे गट 02

ठाकरे गट 02

भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार फाईट

दोन्ही पक्षांचे सध्यातरी बलाबल

शिरोळ तालुका

हेरवाड येथील सौ रेखा अर्जुन जाधव सरपंच पदी विजयी

काँग्रेस स्वाभिमानी स्थानिक आघाडी विजयी

09:23 December 20

शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात

शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात

संभाजीपूर मधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे उमेदवार विजयी

अकिवाट मधून सरपंच पदाचे सौ. वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी..

खिद्रापूर मधून सरपंच पदाचे उमेदवार सौ. सारिका कुलदीप कदम विजयी..

टाकवडेमधून सरपंच पदाचे उमेदवार सौ. सविता मनोज चौगुले विजयी..

वडणगे गावात शिवसेना ठाकरे गटाची सत्ता

सरपंच संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी यांची सरपंच पदी विजयी

करवीर तालुका

करवीर तालुक्याका कावणे गावात शुभांगी प्रतापसिंह पाटील (भाजप) सरपंच पदी

भाजपच्या चार आणि काँग्रेसच्या पाच असे सद्या करवीर मध्ये बलाबल

भाजपने पहिल्याच निकालात खाते उघडले आहे

09:22 December 20

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट

कागल तालुक्यातील बामणीत पहिला निकाल हाती आला आहे. मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. सरपंचासह राजे गटाने बाजी मारली आहे.

08:45 December 20

Live Gram Panchayat Election आम्हाला कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर विधानसभेत चर्चा हवी-आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यातील 7135 ग्रामपंचायतीचे निकाल आज ( 7135 gram panchayat results ) लागणार आहेत.

Last Updated : Dec 20, 2022, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details