मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्प मांडला. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी अनेक नव्या घोषणा केल्या आहेत. कृषी, शिक्षण, बेरोजगार, महिला सुरक्षेसाठी भरीव निधींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आमदारांसाठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. आमदार विकासनिधी २ कोटींवरुन ३ कोटी करण्यात आला आहे.
महा 'अर्थ': आमदार फंडात ३ कोटीपर्यंत वाढ, तर राज्यात पेट्रोल-डिझेल महागणार - महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020
महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सभागृहात अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. कर्जाचा वाढता बोजा, घटणारा विकासदर या पार्श्वभूमीवर अजित पवारांना अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
अर्थसंकल्प LIVE, अजित पवार विधीमंडळात दाखल
बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र आले. या महाविकास आघाडीने राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत.
- 12.08 - हाच माझा देश, हीच माझी माती या सुरेश भटांच्या ओळीने अर्थसंकल्पीय भाषण समाप्त केले.
- 12.07 - हाजीअली विकास आरखडा तयार करुन निधी देणार
- 12.06 - पर्यावरण पुरक कामे हाती घेणार
- 12.05 - राज्यातील उद्योगांना चालना मिळवण्यासाठी कर सवलत
- 12.04 - सारथी संस्थेचे स्वायत्तता कायम ठेवणार
- 12.03 - नाट्य संमेलनासाठी १० कोटींचा निधी
- 12.02 - कोकणात फळ प्रक्रिया उद्योगासाठी १५ कोटी रुपये देणार
- 12.01 - गरीब मुला मुलींना परदेशी शिक्षणासाठी नवीन योजन राबवणार, त्यासाठी १२० कोटी रुपये
- 12.00 - अल्पसख्यांकाच्या विकासासाठी योजना आखणार
- 11.59 - गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार योजनेसाठी प्रोत्साहन देणार
- 11.58 - तृतीयपंथींच्या विकासासाठी मंडळ स्थापन करणार, त्यासाठी ५ कोटी निधी
- 11.57 - महात्मा फुलेंच्या योगदानासाठी
- 11.56 - एसटीच्या नव्या १६०० बस आणणार
- 11.55 - वंचित घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध
- 11.54 - आमदारांच्या विकासनिधीत वाढ- ३ कोटी
- 11.53 - आमदार फंडामध्ये वाढ, २ कोटीवरुन ३ कोटी
- 11.52 - वरळीमध्ये जागतिक पर्यटन स्थळ उभारणार
- 11.51 - पर्यटनाला प्रोत्साहान देण्यासाठी पर्यटन पदवी अभ्यास सुरु करणार
- 11.50 - रोज १ लाख शिवभोजन थाळी देणार
- 11.48 - नवीन वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात येणार
- 1147- नदी प्रदुषण निवारण्यासाठी निधी उपलब्ध करणार
- 11.46 - मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
- 11.45 - २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा
- 11.44 - मराठवाडा विभागात पाणी टंचाई निवारण्यासाठी २०० कोटी रुपये देणार
- 11.43 - मुंबई मराठी ग्रंथालयासाठी ५ कोटींचे अनुदान
- 11.42 - महिला सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध
- 11.40 - प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार
- 11.38 - महिलांच्या सुरक्षेसाठी योजना राबवणार
- 11.37 - महिला बचत गटांना प्रोत्साहान देणार
- 11.35 - स्थानिक उमेदवारांना ८० टक्के रोजगार देण्यासाठी कायदा करणार
- 11.34 - महाराष्ट्र शिकाऊ प्रोत्साहन योजना राबवणार
- 11.32 - १० लाख तरुणांना रोजगार देणार
- 11.31 - युवक युवतींना प्रत्येक हाताला काम देण्यास शासन कटीबद्ध
- 11.30 - रोजगार आणि शिक्षणासाठी योजना राबवणार
- 11.25 - मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवणार
- 11.24 - पुणे येथे ऑलंपींक भवन बांधणार
- 11.24 - रयत शिक्षण संस्थेला ११ कोटी अनुदान देण्यात येणार आहे
- 11.23 - नवीन बस देणार
- 11.22 - वायफाय बस उपलब्ध करुन देणार
- 11.21 - 78 कोटी सोलापूर व पुणे येथे विमानतळ उभारण्यासाठी
- 11.20 - सौर कृषी पंपसाठी ६७० कोटी रुपये देणार
- 11.20 - २०२० ते २०२४ - ग्रामीण सडक योजनेसाठी १ हजार ५०० कोटींचा निधी
- 11.19 - मेट्रोच्या विकासासाठी १ हजार ६५७ कोटी
- 11.18 - केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अजित पवारांनी केले अभिनंदन
- 11.17 - नागपूर जिल्ह्यात उर्जा प्रकल्प उभारणार
- 11.17 - कोकणचा विकास सरकारसाठी प्राधान्याचा विषय
- 11.16 - साकोली (भंडारा) नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करणार
- 11.15 - जलसंपदा विभागासाठी १० हजार ३५ कोटी
- 11.14 - मृदा संधारणासाठी २ हजार ८१० कोटी
- 11.13 - नियमीत कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर देणार
- 11.12 - सिंचन प्रकल्पांना प्रधान्य देणार, ते पूर्ण करणार
- 11.11 - २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना दिलासा
- 11.10 - शेतकऱ्यांना हेलपाटे न करता कर्जमाफी दिली
- 11.00 - शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न
- 10.30 -अजित पवार यांच्याकडू अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात
- 10:20 - अजित पवार विधीमंडळात दाखल
Last Updated : Mar 6, 2020, 1:14 PM IST