मुंबई: गेल्यावर्षीच वसई परिसरातील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रद्धा वालकर या भयानक हत्याकांडाने देश हादरून गेला होता. त्यानंतर मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (32) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने (56) याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे बारीक बारीक तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकरमध्ये शिजवले. नंतर ते तुकडे बकेट, टब आणि पातेल्यामध्ये ठेवल्याचे आढळले.
कुकरमध्ये शिवजले मृतदेहाचे तुकडे: मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये, मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने, शेजार्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले. सुरवातीला पोलिसांना तिच्या पायाच्या मांड्या स्वयंपाकगृहात आढळल्या. धड आणि शिर नव्हते. त्याचा शोध घेतला असता घरातच ते कापून बकेट आणि पातेल्यात ठेवले होते. आरोपी साने याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. तसेच ते कुकरमध्ये शिवजले आणि गॅसवर भाजले होते. पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने ते घरातील पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 4 दिवसांपूर्वी साने याने ही हत्या केल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.
मुंबई मिरारोड सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात आरोपीने 32 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले. त्याचबरोबर आरोपीने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे शिजवून मिक्सरला लावून ते कुत्र्यांना खाऊ घातले. - वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी