- 10.12 PM रत्नागिरी -पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश. दोरीच्या सहाय्याने वाचवले प्राण; संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील घटना
- 9.36 PM पुणे -आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पैकिकरी आणि लिपीक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. पैशांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. वाळूची गाडी सोडण्यासाठी मागितली होती लाच.
- 8.58 PM बीड -बीडचेपोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली झाली. त्यांच्या जागी आता नागपूर येथून हर्ष पोद्दार हे नवे पोलीस अधीक्षक बीडसाठी येणार आहेत.
- 8.20 PM औरंगाबाद -डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
- 7.57 PM यवतमाळ -शिवाजी गार्डन परिसरातून १८ वर्षीय तरुणाचे अपहरण; चार अपहरणकर्त्यांनी केले अपहरण. पोलिसांची सहा पथक तरुणाचा शोध घेत आहेत. अपहरणकर्त्यांकडून हर्षच्या वडिलांना 50 लाख रुपयांची मागणी
- 7.21 PM रत्नागिरी -चिपळूणच्या परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प
- 7.05 PM मुंबई -धावारीत ७ वर्षांचा मुलगा उघड्या गटारात पडला
- 6.40 PM नाशिक -दर गुरुवारी करण्यात आलेली पाणी कपात रद्द; महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय. मात्र, दिवसातून एकदाच होणार पाणी पुरवठा. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 53 टक्के भरल्याने महानगरपालिकेने घेतला निर्णय.
- 6.28 PM -चंद्रपुरातट्रकखाली येऊन पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूशासनाच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर वर्ष अखेरीला पाच दिवसांचा आठवडा, तर पुढच्या महिन्यात सेवनिवृत्तीचे वय साठ
- 6.22 PM मुंबई -शासनाच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर; वर्ष अखेरीला पाच दिवसांचा आठवडा, तर पुढच्या महिन्यात सेवनिवृत्तीचे वय साठ
- 6.02 PM सांगली - चंद्रकांत पाटील यांच्याकडून आमदार सुरेश हाळवणकर यांची पाठराखण. ‘भाजपच्या ओळखपत्रावर चंद्रकांत पाटलांचा फोटो असल्यास टोलमाफी’, असा गौप्यस्फोट, भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला होता.
- 5.30 PM गोंदिया - गोंदिया पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची नवी मुंबई मुख्यालयात बदली...गोंदिया जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून मंगेश शिंदे येत आहेत.
- 5.00 PM लातूर - चुकारवाडी ग्रामस्थांचा रस्त्यासाठी 'रास्तारोको'
- 4.20 PM बीड - शासकीय स्वस्त धान्य गोदामात 81 लाख रुपयाचा घोटाळा; संबंधित गोदामपाल याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- 3.40 PM आसाम- आसाममध्ये पुराचा हाहाकार; हजारो लोकांचे विस्थापन
- 3.10 PM शिर्डी - सुजय विखे व बाळासाहेब थोरात यांचा बरोबर प्रवास; शिर्डीहुन दिल्लीकडे जाताना एकत्र प्रवास
- 2.45 PM मुंबई - श्रीदेवीचा मृत्यू 'अपघात की घातपात', चर्चेला पुन्हा उधाण
- 2.30 PM नवी दिल्ली - साक्षी-अजितेश यांचा विवाह वैध, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा
- 2.15 PM रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटना; आणखी एक मृतदेह सापडला, मृतांची संख्या 21 वर
- 2.00 PM औरंगाबाद - मंदिरातील दानपेटी फोडून 60 हजाराची रोकड लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद
- 1.45 PM मुंबई - नो पार्किंगमध्ये मुंबईकरांना दंड, महापौरांवर मात्र कारवाई नाही
- 1.25 PM मुंबई- बंदी आदेश झुगारून पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या २९ पर्यटकांना खारघर पोलिसांनी घेतले ताब्यात
- 1.15 PM बुलडाणा- मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले, चालक फरार
- 01.00 PM मुंबई- आयआयटीच्या विद्यार्थ्याला धडक देणाऱ्या 'त्या' बैलाला पालिकेने घेतले ताब्यात
- 12.50 PM- खळबळजनक..! विरह सहन न झाल्याने विवाहितेची प्रियकरासह आत्महत्या
- 12.40 PM मुंबई - मुंबई पोलिसांनीही थकवले पालिकेचे पाणी बिल, रक्कम ऐकून व्हाल थक्क!
- 12.30 PM पणजी- गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू...
- 12.20 PM हिमाचल प्रदेश - सोलन इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १० वर, ४ जण अद्यापही ढिगाऱ्याखालीच
- 11.40 AM नवी दिल्ली - मुक्काम तुरुंगातच..! सर्वोच्च न्यायालयाने आसाराम यांचा जामीन अर्ज फेटाळला
- 11.20 AM नवी मुंबई - Breaking news नवी मुंबईत दोन टोळ्यांमध्ये गोळीबार
- 11.15 AM बंगळुरू - कर्नाटकमधील काँग्रेस जेडीएस सरकारने बहुमत सिद्ध करावे, भाजपची मागणी
- 10.00 AM मुंबई- चोरीचे मोबाईल कुरियरने परदेशात पाठवणारी टोळी गजाआड
- 9.45 AM मुंबई - काँग्रेसने कार्यकारिणीत 'जातपंचायत' आणली, सेनेचा 'सामना'तून निशाणा
- 9.35 AM रत्नागिरी - जिल्ह्यातील मुसळधार पावसाने मुंबई-गोवा महामार्ग बंद; वाशिष्टीची पाणी पातळी वाढली
- 9.20 AM मुंबई- नायर रुग्णालय डॉक्टरांना मारहाण प्रकरणी एकास अटक, गुन्हा दाखल झालेल्या २ महिलांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही
- 9.15 AM हिमाचल प्रदेश दुर्घटना : मृतांचा आकडा ८ वर, ६ जवानांसह एका नागरिकाचा समावेश
- 9.00 AM वर्धा -..पण शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊसरुपी आनंद येऊ दे - सुधीर मुनगंटीवार
- 8.45 AM नांदेड -नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील याच शिवसेनेच्या उमेदवार, मंत्री अर्जुन खोतकरांचे संकेत
- 8.30 AM नांदेड - कौटुंबिक वादातून तरुणाने पोलीस ठाण्यातच स्वतःला घेतले पेटवून, उपचार सुरू
- 8.15 AM रत्नागिरी - येत्या २४ तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
- 8.00 AM मुंबई -कर्नाटकचे बंडखोर आमदार आज सर्वोच्च न्यायालयात जाणार
- 7.45 AM रत्नागिरी -तिवरे धरण दुर्घटना: विशेष चौकशी पथक आज करणार घटनास्थळाची पाहणी
- 7.30 AM नाशिक - खेकडे धरण फोडताहेत याची जास्त काळजी करा; थोरातांचा महाजनांना टोला
LIVE BLOG आज आत्ता : रत्नागिरीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश - मराठी
झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एकाच ठिकाणी..
LIVE BLOG आज आत्ता
Last Updated : Jul 15, 2019, 10:35 PM IST