मुंबई - लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात 17 मेपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊन वाढवताना सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. यात मद्यविक्रीवरील निर्बंधही कमी झाले आहेत. मद्यविक्रीतून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आले आहे. कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर भागात मद्यविक्रीवर निर्बंध असणार आहेत, असं पत्र मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केले आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे.
अशी होईल मद्यविक्री -
- दुकानांसमोर 5 पेक्षा अधिक ग्राहक असू नये -
- दोन ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर बंधनकारक
- सहा फूटांवर वर्तुळ आखणे बंधनकारक -
- संबंधित परवानाधारकाने कामगार, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावे