महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत दारूची दुकाने बंद राहणार - आयुक्त अण्णासाहेब मिसाळ - आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 314 असल्याने खबरदारीसाठी दारू विक्री होणार नसल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

नवी मुंबईत दारूची दुकाने बंद राहणार - आयुक्त अण्णासाहेब मिसाळ
नवी मुंबईत दारूची दुकाने बंद राहणार - आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

By

Published : May 4, 2020, 8:07 PM IST

नवी मुंबई - दारू विक्रीस आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये दारू विक्रीस सरकारने परवानगी दिली असली तरी नवी मुंबईत विरोध केला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 314 असल्याने खबरदारीसाठी दारू विक्री होणार नसल्याचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

नवी मुंबईत दारूची दुकाने बंद राहणार - आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

नवी मुंबईत दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ग्रीन झोन, ऑरेंज झोनमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, रेड झोनमध्ये कोणत्याही प्रकारे नियम शिथिल करण्यात आले नसून नियमांतही काहीही बदल झाले नाहीत. मात्र, काही ठिकाणी रेड झोनमध्येही दारूविक्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई ही "रेड झोन"मध्ये येत असून आतापर्यंत नवी मुंबईत 314 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यक्तिरिक्त दारू विक्रीसाठी असणारी व इतर दुकाने बंद राहतील, असे नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. मात्र नवी मुंबईतील काही ठिकाणी तळीरामांनी आशा सोडली नव्हती. दारूची दुकाने उघडतील या आशेवर ते दारूच्या दुकानाबाहेर रांगा लावून उभे असल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details