मुंबई-तब्बल १५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा भारत ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. मुंबईसह देशभरात प्रचंड उत्साह असून अनेक ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगी रोषणाईने उजळले 'मंत्रालय' - सी. विद्यासागर राव
उद्या मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काश्मीरमधील ३७० कलम आणि राज्यातील पूरपरिस्थितीचे सावट स्वातंत्र्यदिनावर आहे. कडक सुरक्षाव्यवस्थेत विधिमंडळ, मंत्रालय, नवीन प्रशासकीय इमारत आणि मंत्रालयाची मुख्य इमारत तिरंगी रंगांच्या रोषणाईने उजळून टाकल्या आहेत. उद्या मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.