मुंबई - कर्नाटक किनारपट्टी ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. वातावरणातील या चढ उतारामुळे सध्या मुंबईकरांना ऐन थंडीत पावसाळयाचा अनुभव येत आहे. काल (गुरुवार) मुंबई शहरातील काही तुरळक पाऊस पडला होता. पुढच्या दोन ते तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऐन थंडीत मुंबईकरांना छत्री सोबत बाळगावी लागत आहेत.
ऐन थंडीत मुंबईत बरसल्या पावसाच्या हलक्या सरी - मुंबई पाऊस न्यूज
महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरणासोबत दाट धुके पडले आहे. अनेक ठिकाणी दवबिंदू दिसून येत आहेत. यामागे अफगाणिस्तानकडून येणारे पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण आहे. येत्या १२ जानेवारी दरम्यान राज्यात पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा हवामान खात्याने वर्तवली आहे.
पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र तसेच विविध भागात हलक्या पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरणासोबत दाट धुके पडले आहे. अनेक ठिकाणी दवबिंदू दिसून येत आहेत. यामागे अफगाणिस्तानकडून येणारे पश्चिमी वारे म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वैज्ञानिक कारण आहे. येत्या १२ जानेवारी दरम्यान राज्यात पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा हवामान खात्याने वर्तवली आहे.