महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हायअलर्ट जारी, जुहू समुद्रकिनारी लाइफगार्ड तैनात - जुहू समुद्रकिनारी लाइफगार्ड तैनात

अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आले आहेत. काही तासांत हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावरही मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने लाइफगार्ड तैनात केले आहेत

Nisarga Cyclone in maharashtra
निसर्ग चक्रीवादळ करणार रौद्ररुप धारण

By

Published : Jun 2, 2020, 3:29 PM IST

मुंबई - कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्या जनतेला बुधवारी निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावरही मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने लाइफगार्ड तैनात केले आहेत. लॉकडाऊनमुळे समुद्रकिनारी बंदी असली तरी संपूर्ण सुरक्षेची खबरदारी पालिकेकडून घेण्यात आली आहे.

अरबी समुद्रात येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आले आहेत. काही तासांत हे वादळ रौद्ररूप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण याठिकाणी काही भागांवर मोठा परिणाम होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details