मुंबई - मुंबई सत्र न्यायालयातील ( Bombay session court ) अतिरिक्त सत्र न्यायाधीश जोगळेकर यांनी आज सायबर दहशतवादी प्रकरणात ( Cyber Terrorism Case ) अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर आरोपी अनिस शकिल अन्सारी (28) या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 25,000 हजाराचा दंड देखील सुनावला आहे 2014 मध्ये आरोपीला एटीएसने अटक केली होती तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा - आरोपी अनिस शकिल अन्सारी याने अमेरिकन स्कूलवर सुसाईड बॉम्ब हल्ला करण्याचा कट प्रकरणात 2014 साली एटीएसने अनिस अन्सारीला अटक केली होती. आरोपी अनिस शकिल अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी विरोधात एटीएसने 43(A), 66(F) माहिती तंत्रज्ञान कायदा सह 115,120(b) अन्वये गुन्हा दाखल केला होता.