महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केडला भीषण आग, 1 जणाचा मृत्यू

ग्रँट रोड परिसरात असलेल्या आदित्य आर्केड इमारतीला रविवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास भीषण आग लागली. आग विझवताना धुरामुळे घुसमटल्याने तसेच डिहायड्रेशन झाल्याने मेमन वाडा अग्निशमन केंद्राचे सुधान गोरे तसेच भायखळा अग्निशमन केंद्राचे नंदकुमार वायल यांना डाव्या हाताला जखम झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

आग

By

Published : Oct 13, 2019, 9:12 AM IST

Updated : Oct 13, 2019, 3:47 PM IST

मुंबई - येथील ग्रँट रोड परिसरात असलेल्या आदित्य आर्केड इमारतीला सकाळी ६ ते ७ च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी बचावकार्यादरम्यान अग्निशामक दलाचे २ जवान जखमी झाले आहेत.

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केड इमारतीला भीषण आग

आज(रविवारी) पहाटे 06:05 च्या सुमारास मुंबई, गिरगाव येथील पदमजी स्ट्रीट, ड्रीमलँड सिनेमा जवळील आदित्य आर्केड या इमारतीमध्ये आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाची ८ वाहने दाखल झाली असून आगीची तीव्रता लेव्हल ४ ची असल्याचे अग्निशमन दलाने घोषित केले आहे. या इमारतीत ८-१० जण अडकले असल्याची माहिती असून अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तर, रुग्णवाहिकाही दाखल झाली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

या आगीमध्ये अडकलेल्या 1 जणाचा मृत्यू झाला आहे. तर 8 ते 10 जणांना सुरक्षित ठिकाणी वाचविण्यात यश आले आहे. आगीला विझविण्यासाठी सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 16 फायर इंजिन, 3 श्वसन उपकरणे व्हॅन, 10 पाण्याचे टँकर, तसेच 10 अधिकारी आणि माणसे यांचा समावेश आहे.

घटनास्थळी किरकोळ जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दिलीप चौधरी(४०), अशोक चौधरी(२३) आणि भारत चौधरी(२३) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा - महाजनादेश यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची 'मुंबई चाले भाजपासोबत' प्रचाराला सुरुवात
इमारतीतील 3 ऱ्या / 4 थ्या मजल्यावरील एक जण बेपत्ता होता, त्याला बाहेर काढून जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर, आग विझवताना धुरामुळे घुसमटल्याने तसेच डिहायड्रेशन झाल्याने मेमन वाडा अग्निशमन केंद्राचे सुधान गोरे तसेच भायखळा अग्निशमन केंद्राचे नंदकुमार वायल यांना डाव्या हाताला जखम झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - 'गुजरात्यांनी आंदोलन केले की नेतेपद, आम्ही केली की खटले'

Last Updated : Oct 13, 2019, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details