मुंबई- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता राज्यात पाय पसरवायला सुरुवात केली. कोरोनाचा विळखा वाढत असून त्याबाबत अनेक खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूबाबत व्हाॅट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अशा आशयाचे पत्र मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पाठवले आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्तांचे पोलीस आयुक्तांना पत्र - कोरोना मुंबई बातमी
नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 54 अंतर्गत तत्काळ कारवाईचे आदेश देण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचे मुंबईत 4, तर राज्यात 22 रुग्णांचा आकडा पोहोचला आहे.
letter-of-municipal-commissioner-to-police-commissioner-for-corona-fake-news
हेही वाचा-कोरोनाचा धसका : बिहारमधील शिवहर जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू
नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 54 अंतर्गत तत्काळ कारवाईचे आदेश देण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचे मुंबईत 4, तर राज्यात 22 रुग्णांचा आकडा पोहोचला आहे.
Last Updated : Mar 14, 2020, 8:03 PM IST