महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Letter Of Women's Commission : राणे पिता पुत्रांसह चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता - दिशा सालीयान प्रकरण

राज्य महिला आयोगाने (State Women's Commission ) मालवणी पोलिसांना एक पत्र दिले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील (BJP state president Chandrakant Dada Patil) यांनी दिशा सालीयान प्रकरणात (Disha Saliyan case) बदनामी केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे म्हणले आहे. या संदर्भातील अहवाल 24 तासात द्यावा असेही आयोगाने म्हणले आहे.

Union Minister Narayan Rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे

By

Published : Feb 27, 2022, 11:09 AM IST

Updated : Feb 27, 2022, 11:37 AM IST

मुंबई: दिशा सालियनची सातत्याने होणारी बदनामी थांबवावी अशी विनंती सालियान कुटुंबियांनी वारंवार केल्या नंतरही केंद्रिय लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे हे या प्रकरणाचा आधार घेत सातत्याने टिका करत होते. दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली, ती गरोदर होती असा नारायण राणेंचा दावा होता. यावरुन ते या प्रकरणात अनेक लोक अडकल्याचा आरोप करत शिवसेनेला टार्गेट करत होते. सालियन कुटुंबियांनी या संदर्भात नुकतीच राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती. महिला आयोगाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अहवालही मागवला होता. त्या अहवाला नुसार तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नाही तसेच मृत्यूच्या वेळी ती गरोदर नव्हती असे म्हणलेले आहे.

सुशांतसिंग राजपूत चे आत्महत्या प्रकरण देशभर गाजले, त्याच्या आत्महत्येच्या काही दिवसाआधी दिशा सालियान हिचा इमारती वरुन पडल्या मुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या संदर्भात तीची आत्महत्या की खुन असे प्रश्न उपस्थित केले गेले, दिशाच्या आत्महत्येचा तपास सुरु होता. दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहेका हे पण तपासण्यात येत होते. दिशाने आत्महत्या केली नसून तीच्यावर अत्याचार करुन तीला ढकलून मारल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलीस तपासात तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पाेलिसांना सापडले नव्हते तसा अहवाल पोलिसांनी महिला आयोगाला दिला होता. संदर्भात महिला आयोगाने मालवणी पोलीसांना सविस्तर पत्र देत या प्रकरणात राणे पिता पुत्रांसह भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Last Updated : Feb 27, 2022, 11:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details