मुंबई:'आयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धा' ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत असून यंदा भारताकडे त्याचे यजमान पद आहे. भारतातील खेळपट्ट्यांवर आता जगभरातील खेळाडू आयपीएलच्या निमित्ताने खेळत असतात. मात्र, तरीही भारत आणि उपखंडातील खेळाडूंसाठी भारतातील खेळपट्ट्या ह्या अधिक फायदेशीर ठरू शकतात, असे मत सहवाग आणि मुरलीधरन यांनी यावेळी मांडले.
तरच भारत जिंकू शकतो:कोणत्याही खेळाडूची क्षमता आणि त्याची नैसर्गिक शैली ओळखून त्याला खेळ खेळू दिला पाहिजे. जर एखादा खेळाडू कमी चेंडूंमध्ये अधिक रन करण्यात वाकबगार असेल तर त्याला त्या पद्धतीने खेळू द्यायला पाहिजे. 2011च्या विश्वचषक जिंकलेल्या संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन होते. त्यांनी अतिशय मेहनत घेऊन सर्वांना कसे खेळावे हे सांगितले. तर विश्वचषकाच्या आधीपासूनच प्रत्येक सामना हा 'नॉक आउट' सामना आहे. याच दृष्टीने खेळाचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे प्रत्येक सामना आम्ही जिद्दीने आणि जीव तोडून खेळलो. त्यामुळेच विजय संपादित झाला जर विजयाची पुनरावृत्ती करायची असेल तर पुन्हा त्याच पद्धतीने खेळले पाहिजे. तरच विजय मिळू शकतो आणि हा विश्वचषक भारताच्या नावावर लागू शकतो, असे सेहवाग यांनी सांगितले.