मुंबई:कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) हे 55 दिवस 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रेमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहतील, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रकृती अत्यावस्थच्या कारणामुळे शरद पवार या यात्रेला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळत आहे. 31 ऑक्टोबरला शरद पवार यांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरालाही दुसऱ्या दिवशी काही वेळासाठीच शरद पवार यांना उपस्थित राहता आले. दोन दिवसांपूर्वी आठ दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला असला तरी, अद्याप त्यांना आरामाची गरज असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्या 'भारत जोडो' यात्रेमध्ये शरद पवार राहणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
'भारत जोडो' यात्रेला शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता कमी
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) हे 55 दिवस 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रेमध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे 'हे' नेते राहणार उपस्थित:पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार भारत जोडी यात्रेला जाण्याची शक्यता धूसर असली तरी, 'भारत जोडो' या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत 10 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रियाताई सुळे (MP Supriyatai Sule), माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) हे सहभागी होणार आहेत. या सोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जाहीर सभेतही उपस्थित राहणार आहेत.
भारत जोडो यात्रेला आज नांदेडमध्ये सुरूवात:माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Former Chief Minister Ashok Chavan) यांनी आज एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांच्या राजकीय वारसदाराची घोषणाच केली आहे. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत ( Bharat jodo yatra ) सहभागी झाली. भारत जोडो यात्रेतून त्यांचा राजकारणातील प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते आणि ती चर्चा आज अशोक चव्हाण यांच्या ट्वीटमुळे खरी ठरली आहे.