महाराष्ट्र

maharashtra

आरे कॉलनीत बिबट्याचा आठ वर्षीय मुलावर हल्ला, सुदैवाने जीवित हानी नाही

By

Published : Sep 20, 2021, 4:41 PM IST

Updated : Sep 20, 2021, 5:13 PM IST

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत वाढत आहे. शनिवारी बिबट्याने एका आठ वर्षीय मुलावर हल्ला चढविला होता. वेळीच त्याचे वडील घटनास्थळी पोहोचले आणि मशालीने बिबट्याला हुसकावून लावले. यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

म
c

मुंबई - गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत वाढत आहे. शनिवारी (दि. 18 सप्टेंबर) बिबट्याने एका आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केला होता. सुदैवाने मुलाचे वडील घटनास्थळ पोहोचले व त्यांच्या हातातील मशालीने बिबट्याच्या हुसकावून लावल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

आरे कॉलनीत बिबट्याचा आठ वर्षीय मुलावर हल्ला, सुदैवाने जीवित हानी नाही

रोहित, असे त्या मुलाचे नाव आहे. रोहित शनिवारी रात्री दुकानला गेला होता. दुकानातून परतत असताना आरे कॉलनीच्या युनिट 31 मध्ये बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. वेळीच रोहितचे वडील त्या ठिकाणी पोहोचले व बिबट्याला मशालीने पळवून लावले. यात रोहितच्या पायाला तीन ठिकाणी दुखापत झाली आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याचा लोक वस्तीत वावर वाढला असून याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने परिसरातील श्वानांवर हल्ला केला होता. वन अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा -'कर नाही, तर डर कशाला' नाना पटोले यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Last Updated : Sep 20, 2021, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details